businessman misbehaves with woman by committing help to her  
विदर्भ

संतापजनक! मुलीच्या लग्नासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि हॉटेल व्यावसायिकाने महिलेचे केले लैंगिक शोषण 

संतोष ताकपिरे

अमरावती :  हॉटेल व्यावसायिकाने एका महिलेला लग्नाचे आमिष, तर मुलीच्या लग्नासाठी मदतीचे आश्‍वासन देऊन आठ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला. राजापेठ पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

संजय रमेश शर्मा (वय 45), असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले. पीडित विवाहितेची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याचे ती सदर व्यावसायिकाच्या एका प्रतिष्ठानात काम करीत असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. एवढेच नव्हे तर पीडितेच्या मुलीचे दुसरीकडे लग्न लावून देण्याकरिता मदतीचे आश्‍वासन देऊन अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला. 

महिलेने व्यावसायिकाविरुद्ध तक्रार नोंदविली. प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (ता. 26) सायंकाळी गुन्हा दाखल केला. 25 ऑगस्ट रोजी पीडितेच्या मुलाला रात्री दहाच्या सुमारास रस्त्यात अडवून त्याला कुटुंबासह जिवाने मारण्याची धमकीही शर्माने दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केल्याचे पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाउनमध्ये हल्ला

अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या संबंधित हॉटेल व्यावसायिकावर सरोज सिनेमागृहासमोरील एका हॉटेलमध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातील हल्लेखोरांना कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. 

महिला अत्याचाराशी संबंधित तक्रार असल्याने प्रारंभिक चौकशी केल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल केला. महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीडितेचे बयाणही नोंदविले.
-किशोर सूर्यवंशी,
पोलिस निरीक्षक.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT