CCIM and the Ministry of AYUSH have decided to allow Ayurvedic practitioners to perform 58 types of surgeries 
विदर्भ

'आयएमए'चे धरणे आंदोलन; सरकारी निर्णयाचा निषेध, दखल न घेतल्यास पुन्हा लढा

चेतन देशमुख

यवतमाळ : आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे व त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे. परंतु, आयुर्वेदात संशोधन न झाल्याने हे प्राचिनशास्त्र मागे पडले. शासनाने आयुर्वेदाला चालना देत त्याला कालानुरूप आणण्यास प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. सीसीआयएम व आयुष मंत्रालयाने 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदिक चिकित्सकांना करण्यास परवानगी देण्याचे ठरविले आहे. याविरोधात मंगळवारी  इंडियन मेडिकल असोसिएशन व डेन्टल असोसिएशन यांच्यातर्फे येथील तिरंगा चौकात निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

आयुर्वेदाच्या प्राचीन वटवृक्षावर ऑलोपॅथिरूपी कलम छाटून लावणे हे आयुर्वेदाला खुजे करणे होय. त्यापेक्षा वेदात विशद केलेल्या व सुश्रुताने विकसित केलेल्या शल्यशास्त्रात संशोधन करून आयुर्वेदाची महती वाढवावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, शासन व आयुष मंत्रालयाकडून तसे होताना दिसत नाही. शस्त्रक्रिया हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. ती शिकायला एका सर्जनला साडेपाच वर्षे, त्यानंतर त्यातील स्पेशलायझेशन करायला आणखी तीन वर्षे व नंतर दोन ते तीन वर्षे ज्येष्ठतज्ज्ञांसोबत काम करून ती शस्त्रक्रिया तंत्र आत्मसात केली जाते. त्यात शासकीय बॉण्डचा कालावधी समाविष्ठ केल्यास तब्बल 15 वर्षे लागतात. याला समांतर असा पर्यायी अभ्यासक्रम आयुष मंत्रालयाला आयुर्वेदाचार्यसाठी आणल्यास तो स्वागतार्ह राहील. 

कोणतीही शस्त्रक्रिया आत्मसात करणे व ती करताना येणाऱ्या सर्व प्रकारचा जोखमी, गुंतागुंत याला संपूर्ण तंत्र पूर्ण प्रणाली लागते. याबद्दल सीसीआयएम किंवा आयुष मंत्रालयाकडून काहीही स्पष्टीकरण नाही. सामान्य माणसाला आयुष आयुर्वेदाचार्य व ऍलोपॅथिक सर्जन यातला फरक समजावणे आवश्‍यक असल्याची मागणी 'आयएमए'ची आहे. आयुर्वेदिक संशोधन व गुणवत्ता मूल्यांकनावर भर द्यावा, अशी मागणी डॉक्‍टरांची आहे. परंतु, असे शॉर्टकट काढून सरकारने सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळू नये, अशी अपेक्षाही निवेदनात केली.

शासनाने फेरविचार न केल्यास 11 डिसेंबरला राष्ट्रव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा आयएमए व आयडीएने निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदन देताना 'आयएमए'चे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी, सचिव डॉ. प्रशांत कसारे, डॉ. चेतन दरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कॉंग्रेसच्या समर्थनार्थ मतदारांची नावे वगळली- राहुल गांधीचा गंभीर आरोप

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT