विदर्भ

सेवानिवृत्त प्राध्यापक करतोय शेतीतून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न

नीलेश डाखोरे

नागपूर : जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे दोन अंग आहे. जन्मानंतर मृत्यू अटळ आहे. ते कोणालाच नाकारता येत नाही. प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ ठरलेली असते. आज ना उद्या आपल्याला हे नाश होणारे शरीर सोडावेच लागणार आहे. तरीही अनेकांच्या मनात मृत्यूबाबत भीती असते. स्मशानभूमी, कब्रस्तान याचे नाव घेतले तरी अनेकांच्या शरीरावर शहारे (Farmers news) येतात. येथे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशीच विनवणी ते मनोमनी करीत असतात. मात्र, तुम्हाला कब्रस्तानातच (Farming in the cemetery) राहून शेती करायला सांगितलं तर? नाहीच म्हणाल ना... मात्र, एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने चक्क कब्रस्तानात राहून शेती फुलवली आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न (Trying to get rid of superstition) केला. या शेतकऱ्याचे नाव आहे संजय अंबादास वानखडे... (Cemetery-farming-become-an-attraction-for-Arvi-taluka-people-in-wardha-district)

या पृथ्वी तलावावर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगात काहीना काही विशेष गुण असतो. फक्त प्रश्न असतो तो त्याला अवगत होण्याचा. आपल्यातील गुणांची जाणीव झालेले व्यक्ती म्हणजे संजय होय. संजय यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्राध्यापक झाले. त्यांनी तब्बल ३३ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. राजकारणात आवड असल्याने त्यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली.

यानंतर त्यांनी २०१० मध्ये विधान परिषदेसाठी शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर २०१६ मध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक व २०१९ मध्ये विधानसभेसाठी निवडणूक लढवली. मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावं लागले. पराभवाला खचून न जाता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

संजय हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जुळले असल्याने शेतीतून लोकांची भीती दूर करण्याचा निर्णय घेतला. यातूनच त्यांनी बोहरा समाजाची कब्रस्तानाची शेतीसाठी निवड केली. आर्वीतील संजयनगर येथे बोहरा समाजातील लोकांची कब्रस्तानाची सात एकर जागा आहे. येथेच त्यांनी सेंद्रिय शेती फुलवली आहे. ही जागा त्यांनी पाच वर्षांसाठी घेतली असून, येथे बगिचा आणि विरंगुळा तयार करून देण्याचे आश्वासन बोहरा समाजाला दिले.

घेतात विविध पीक

संजय कब्रस्तानाच्या सात एकर जागेपैकी एका एकरात पपई, एका एकरात मिरची, दोन एकरात तूर, तीन एकरात कापूस, मक्का, भेंडी, टमाटर असे विविध पीक घेत आहेत. तसेच कब्रस्तानात त्यांनी पिकनिक स्पॉट तयार केला आहे. लहान मुलांसाठी बगीचा तयार केला असून खेळणी लावली आहे. तसेच विविध प्रकारच्या फुलांचे झाड लावले आहेत.

नागरिक येतात पीकनिकसाठी

संजय यांनी आपल्या प्रयत्नातून ओसाड असलेल्या कब्रस्तानाला हिरवेगार केले आहे. तसेच पीकनिक स्पॉट तयार केल्याने बोहरा समाजातील लोकांसह अन्य नागरिक येथे भेट देत असतात. येथे येणारे नागरिक निसर्गाच्या सानिध्यात रममाण होतात. विरंगुळा म्हणून ज्येष्ठ नागरिक येथे वेळ घालवत असतात.

वर्षभरापासून राहतात कब्रस्तानात

बोहरा समाजाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी संजय हे वर्षभरापासून कब्रस्तानातच राहत आहे. त्यांचे घर कब्रस्तानापासून फक्त दोन किमी अंतरावर आहे. अधून मधून ते घरी जात असतात. मात्र, मागील तीन महिन्यांपासून ते घरीसुद्धा गेलेले नाही. शेती हा पिढीजात व्यवसाय असल्याचे संजय वानखडे यांनी सांगितले.

शेतीतून नफा मला कमवायचा नाही. येथे येणाऱ्या दु:खी माणसांचे मन प्रसन्न व्हावे हीच माझी इच्छा आहे., मृतात्म्यालाही खऱ्या अर्थाने मोक्षधामाची प्रचिती व्हावी, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच लोकांची अंधश्रद्धा दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. यातून दोन्ही उद्देश साद्य होत आहे. लोकांच्या मनातील भीती दूर होण्यासह निसर्गाकडे चला, निसर्गाची कास धरा, सेंद्रिय शेती आणि दीर्घायुषी व्हा.
- संजय अंबादास वानखडे, शेतकरी

(Cemetery-farming-become-an-attraction-for-Arvi-taluka-people-in-wardha-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT