Certificate of corona positive report is not true 
विदर्भ

हद्दच झाली, कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बोगस, पोलिसाविरुद्ध गुन्हा

संतोष ताकपिरे

अमरावती  ः राज्य राखीव पोलिस दलातील शिपायाने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कोविड रुग्णालयात सादर केलेले प्रमाणपत्रच बोगस निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने  याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी त्या शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अलीम अजीज चव्हाण (वय 35) असे राज्य राखीव पोलिस दलातील त्या शिपायाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. पोलिस शिपायाने सादर केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्रमाणपत्र हे इर्विनमधून दिल्या जाते तसेच आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयातून अनेकांना बनावट प्रमाणपत्र दिल्या जात असल्याचा आरोप सातत्याने होतो. आठवड्यातच एका अपंग व्यक्तीकडून कुण्यातरी कथित एजंटने पैसे घेऊन त्याला प्रमाणपत्र न दिल्याने येथे मारामारी झाली होती. हे विशेष! अलीम हा पॉझिटिव्ह प्रमाणपत्र घेऊन स्वत:च दाखल होण्याकरिता मंगळवारी (ता. 27) कोविड रुग्णालयात गेला. त्याला येथील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी दाखल करून सुद्धा घेतले.

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास

 परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅब टेक्‍निशियनच्या अहवालात संबंधित व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही. येथे रोज तपासणीचे अपडेट ठेवल्या जातात. त्यात कुठेही सदर व्यक्तीचे नाव नसल्याने त्याने सादर केलेले पॉझिटिव्ह प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा अहवाल रुग्णालयाने गाडगेनगर पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याआधारे अलीम विरुद्ध गुन्हा दाखल केला. असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. 
 

प्रमाणपत्र इर्विनमधूनच घेतले

कोविड रुग्णालयात दाखल अलीमची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने सादर केलेले प्रमाणपत्र त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच मिळाल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या बयाणात म्हटले. असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

आवश्‍यक ती कारवाई होईल
एसआरपीएफचा हा शिपाई कोविड रुग्णालयात दाखल झाल्याने देखरेखीत आहे. त्यामुळे सद्य:स्थिती सखोल चौकशी करणे अवघड आहे. बरा झाल्यानंतर पोलिस आवश्‍यक ती कारवाई करतील.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.


संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

PKL 12: प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाला 'या' दिवशी होणार सुरूवात! १२ संघांमध्ये पुन्हा रंगणार थरार

Latest Maharashtra News Live Updates: किमान शिक्षकांवर तरी अशी वेळ येऊ नये, हे सरकार विसरतंय का? - विजय वडेट्टीवार

Hemlata Thackeray: मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुसाइड नोटमध्ये लिहिलं...

Guru Purnima : गुरु नसेल तर गुरु पौर्णिमेला कुणाची करावी पूजा? ; शास्त्र काय सांगते, जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT