accident  Sakal
विदर्भ

चंद्रपूर : उड्डाणपुलावरून वाहन कोसळले; दोघे ठार, दोघे जखमी

अभिषेक गुप्ता असे एका मृत युवकाचे नाव असून, अन्य युवकांची नावे कळू शकली नाही.

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन उड्डाणपुलावरून खाली कोसळले. या अपघातात (Accident) दोन युवकांचा मृत्यू (Death) झाला. तर, दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. १९) दुपारी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील बाबुपेठ बायपास उड्डाणपूल परिसरात घडली. अभिषेक गुप्ता असे एका मृत युवकाचे नाव असून, अन्य युवकांची नावे कळू शकली नाही.

बल्लारपूर येथून एमएच ३४-बीआर ०१४१ क्रमांकाचे चारचाकी वाहन घेऊन चार युवक चंद्रपूरकडे निघाले होते. बाबुपेठ बायपास मार्गावरील उड्डाणपुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन पुलाच्या खाली कोसळले. या अपघातात अभिषेक गुप्ता याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, अन्य एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली. नागरिकांनीच युवकांना वाहनातून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. चारही युवक मद्य प्राशन करून होते, अशी घटनास्थळावर उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. सदर युवक बल्लारपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs SA 2nd ODI: ऑस्ट्रेलिया सलग चौथ्या सामन्यात ALL OUT! द. आफ्रिकेचा ऐतिहासिक मालिका विजय, पाकिस्तानचा विक्रम मोडला

GST: हॉटेलमध्ये राहणे आणि खाणे-पिणे स्वस्त होणार! सामान्यांना कसा लाभ मिळणार? जाणून घ्या...

बॉलिवूडला आता उतरती कळा लागलीये पण याआधी फ्लॉप व्हावा म्हणून काढलेला सिनेमा झालेला सुपरहिट

Varaha Jayanti 2025: यंदा कधी आहे वराह जयंती? जाणून घ्या तारीख, पूजा विधी आणि विष्णूंच्या तिसऱ्या अवताराची पौराणिक कथा

यावेळेस नाही चालली तेजश्रीची जादू? टॉप ५ मध्येही नाही मग TRPमध्ये कितव्या स्थानावर आहे 'वीण दोघातली तुटेना' मालिका?

SCROLL FOR NEXT