Vijay Wadettiwar 
विदर्भ

सर्वाधिक रुग्णवाहिकांच्या संख्येत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसरा

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर  : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा यासाठी रुग्णवाहिकांची मोठी आवश्‍यकता असते. त्यामुळे खनिज विकास निधीतून जिल्ह्यासाठी तब्बल ३८ रुग्णवाहिका खरेदी केल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण गुरुवारी (ता. २९) येथे करण्यात आले. 

लोकार्पणानंतर सर्व रुग्णवाहिका ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सेवेसाठी दाखल होणार आहेत. पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसरा ठरला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. गुरुवारी (ता. २९) पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते सर्व ३८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मार्च महिन्यांत देशासह राज्यात कोरोनाने एन्ट्री केली. मात्र, तब्बल तीन महिने जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. नंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. आजघडीला १३ हजारांवर रुग्णांची संख्या पोहोचली आहे. 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना व अन्य आजारांच्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा यासाठी आरोग्य यंत्रणेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. खनिज विकास निधीच्या माध्यमातून सुमारे १३ ते १४ कोटी रुपये खर्च करून ३८ रुग्णवाहिका खरेदी केल्या.

या रुग्णवाहिकांमध्ये सर्व सुविधा असून, त्या वातानुकूलित आहेत. ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत या रुग्णवाहिका दाखल होणार आहेत, अशी माहिती यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

Gokul Election: आमचे उमेदवार कोल्हापुरात ठरतात; सतेज पाटील

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

LPG Cylinder Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर LPG सिलिंडरचे काय झाले? सणासुदीआधी नवे दर जाहीर; आता कितीला मिळतोय?

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीची रणनीती ठरली! मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी 7

SCROLL FOR NEXT