chandrapur municipal corporation employees should use cycle on friday 
विदर्भ

आता मनपा कर्मचाऱ्यांना प्रत्येक शुक्रवारी सायकलवर येणे बंधनकारक, अन्यथा प्रवेशबंदी

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : महानगरपालिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी सायकलवरून कार्यालयात येणार आहेत. या नवीन उपक्रमाला पुढील शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. शुक्रवारी (ता. 10) मनपा कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली.   

माझी वसुंधरा अभियान हे ऑक्‍टोबर ते 31 मार्च 2021 या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून लागू केले आहे. प्रत्येकाच्या जीवनाशी निगमित, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित शाश्‍वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतूने दर शुक्रवारी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायकलने (यंत्र विरहित) कार्यालयात यावे, असा निर्णय महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला आहे.

प्रत्येक शुक्रवारला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणतेही वाहन आणू नये.  आणल्यास त्यांना मनपा आवारात प्रवेश दिल्या जाणार नाही. ही बाब वैयक्तिक आरोग्य, पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. प्रत्येकाने या अभियान सक्रिय सहभाग घेण्याचे व आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आपल्या सभोवतालच्या संबंधित किमान पाच लोकांना महत्त्व पटवून या अभियानाची व्याप्ती पाठविण्यास सहकार्य करण्याचे धोरण निश्‍चित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT