chicken and egg rates decreases due to bird flu in amravati 
विदर्भ

'बर्ड फ्लू'ची धास्ती; चिकन १६० वरून ९० रुपयांवर, तर अंड्यांचेही भाव घसरले

कृष्णा लोखंडे

अमरावती : राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील परभणी, ठाणे, नगर, बीड व रत्नागिरी येथे पक्षी मृत पावल्याच्या आणि राज्यातील इतर शहरांमध्ये दक्षतेचे दिलेले इशारे याचा परिणाम कोंबड्या व अंड्यांचे भाव धडाधड कोसळण्यात होऊ लागला आहे. पोल्ट्री विक्रेत्यांसह हातगाडीवर अंडी व चिकन विक्री करणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ही झळ बसू लागली आहे.

राज्यात ठाणे, रत्नागिरी, परभणीत बर्ड फ्लूने अनेक पक्षी, कोंबड्यांचा मृत्यू झाला. अमरावतीमध्ये बडनेरा येथे मृत पक्षी आढळले. ते चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून अद्याप अहवाल आला नसल्याने संभ्रमावस्था कायम आहे. दरम्यान, बर्ड फ्लूच्या भीतीमुळे गेल्या चार दिवसांपासून अमरावतीसह परिसरात कोंबड्यांचे भाव 160 रुपयांवरून 90 रुपयांवर आले. ठोक बाजारात कोंबड्यांचे भाव सोमवारी (ता.12) 75 रुपये किलोवर होते. कोंबड्या आणि अंड्यांच्या मागणीत 75 टक्‍के घट नोंदविण्यात आल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले. कोंबडीच्या मागणीत घट झाल्याने दरांमध्येही घसरण झाली. बॉयलर कोंबडी सध्या 75 रुपये किलोने विकली जात असल्याचे अमृता हॅचरीजचे डॉ. शरद भारसाकळे यांनी सांगितले. गावठी कोंबडीच्या दरातही 40 रुपयांची घसरण होऊन ती 220 रुपये किलोने विकली जात आहे.

घाऊक अंड्यांच्या विक्रीमध्ये गेल्या 12 दिवसांत 130 रुपयांची घसरण झाल्याचे लोणी येथील पोल्ट्री संचालक सुरेशसिंग ठाकूर यांनी सांगितले. 1 जानेवारीला शेकडा 530 रुपये असलेला भाव सोमवारी 400 रुपये इतका झाल्याचे त्यांनी सांगितले. किरकोळ बाजारात नगामागे काही ठिकाणी एक ते दीड रुपयांची घसरण झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या काळात चिकनला आणि अंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, बर्ड फ्लूच्या भीतीपोटी अनेक नागरिक कोंबडी आणि अंड्यांचे सेवन करण्याचे टाळत आहेत, असेही विक्रेते चंद्रकांत माहूरकर यांनी सांगितले.

सरकारी दिलासा -
'मानवाला धोका नाही', पक्ष्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी या साथीचा मानवाला धोका नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पक्ष्यांमध्ये हा रोग आढळला असला तरी त्याचे संक्रमण मानवामध्ये होत नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. अंडी आणि चिकन शिजवून खाण्याचा सल्ला सरकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vodafone Idea AGR dues : वोडाफोन-आयडियाला सरकारचा दिलासा, तरीही शेअर्स कोसळले!₹87,695 कोटींच्या AGR ला मुदतवाढ; नेमकं काय घडलं?

Zomato Swiggy Latest News : ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला

Dilip Walse Patil : 'अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ११० कोटींचे अत्याधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारणार' – माजी गृहमंत्री वळसे पाटील!

Nanded News : नववर्ष २०२६ स्वागतासाठी शिस्त आणि सुरक्षिततेचे आवाहन; सिंदखेड पोलीस सक्रिय!

BMC Election: मुंबई महापालिकेसाठी वळणाचे वर्ष! निवडणूक रणशिंग, राजकीय समीकरणांची उलथापालथ आणि विकासकामांचा वेग

SCROLL FOR NEXT