राजेश तुमन्ने 
विदर्भ

विजेच्या धक्‍क्‍यातून आईला वाचविण्यासाठी मुलाने घेतला निर्णय...पण

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : सकाळी सकाळी कूलर जवळून केरकचरा काढत असताना विजेचा धक्का लागल्याने आईने आरडाओरड केली. त्यावेळी झोपेतून उठून आईला वाचविण्यासाठी धावत गेलेल्या मुलालासुद्धा विजेचा धक्का बसला. यात आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाचा मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी (ता. 4) सकाळी सहाच्या सुमारास घडली. राजेश बळिराम तुमन्ने (वय 20), असे मृताचे नाव आहे. अनुसया बळिराम तुमन्ने (वय 45) असे जखमी आईचे नाव आहे.

लाखांदूर येथील तुमन्ने कुटुंबीय सोमवारी (ता. 4) सकाळी झोपून उठले. त्यानंतर महिलेने घरातील केरकचरा काढण्यास सुरुवात केली. तापमान वाढलेले असल्यामुळे रात्रीपासून कूलर सुरूच होता. अनुसया तुमन्ने कूलर जवळून कचरा काढत असताना कूलरला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा झटका बसला. त्यामुळे त्या जोरात किंचाळल्या.

जखमींना केले ग्रामीण रुग्णालयात दाखल

यावेळी झोपून असलेला मुलगा राजेश उठून आईला वाचविण्यासाठी तिच्याजवळ धावत आला. मात्र, त्याने आईला स्पर्श करताच त्यालासुद्धा विजेचा झटका बसला. यावेळी झालेल्या आरडाओरडीमुळे कुटुंबीय व शेजारी घटनास्थळी धावून आले. समयसूचकता ठेवत त्यांनी वीजप्रवाह तातडीने बंद केला. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला; तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत.

लाखांदुरात हळहळ व्यक्त

आईला वाचविताना मुलाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने लाखांदुरात हळहळ केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गोपाल कोसरे घटनेचा तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अटल सेतू' नंतर मुंबईत देशातील सर्वात लांब उड्डाणपूल बांधणार! पण कुठे अन् लांबी किती असणार? वाचा MMRDAचा नवा मास्टरप्लॅन

Women's World Cup: कसली, भारी इंग्रजी बोलते ही पोरगी! भारतीय महिलांनी वर्ल्ड कप जिंकला अन् Viral झाली ही... Video

'अमरेंद्र बाहुबली' री-रिलीज असूनही बाहुबली: द एपिकची रेकॉर्डब्रेक कमाई! प्रभासचा दबदबा कायम!

Mahur News : अचानक आलेल्या पुरातुन पर्यटक बालबाल बचावले....; नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील घटना

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

SCROLL FOR NEXT