1harbhara
1harbhara 
विदर्भ

हवामानात बदल; शेतकऱ्यांनो पिके सांभाळा! 

सकाळ वृत्तसेवा

बोर्डी (जि. अकोला) :  यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाच्या सोयाबीन, मूग, ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही दिवसात घरात येणारे उत्पन्नाचा फायदा झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्याचबरोबर रब्बी हंगामातील पीक घऊन झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई काढण्याच्या मनसुब्याने शेतकरी गहू, हरभरा पीक घेण्याच्या तयारीत लागला आहे. परंतु, हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर मर रोग आल्याने त्याच्याही उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

बाजारात मिळत नाहीत अपेक्षीत भाव
गेल्या आठवड्यापासून परिसरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाची फवारणी केल्या जात आहे. कापाशी पिकावरही लाल्या रोग, मुळ, कुजवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादनातही मोठी घट दिसून येत आहे. कापूस वेचणीचा आणि शेतातून घरापर्यंत वाहतूक खर्च आणि मजूरी वाढली आणि बाजारपेठमध्ये अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी चांगलेच नाराज होत आहे. एकरी खर्चाचे प्रमाण विचारात घेतले तर त्याचे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. खर्चाची ताळमेळ बसवताना हाती येणारे निव्वळ उत्पादन शुन्य अशी अवस्था आहे.

वन्यप्राण्यांचा हैदोस
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. ढगाळ आणि थुक्यामुळे हरभरा पिकावर पण संक्रात येत आहे. हरभऱ्याचे झाड जाग्यावर सुकत आहेत. त्यामुळे कुठ पीक त कुठ कोरडी जमीन दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. कीड आणि अळीचे दिवसेनदिवस अतिक्रमण वाढत चालल्याने हेही पीक हातचे जाते का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अशा विविध रोगापासून पिकाचे संरक्षण करत नाही तोच परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस पण शेतकऱ्यांना शांततेत झोपू देत नाही. रात्रीच्या वेळी उभ्या पिकांना फस्त करतण्याचा कारणामा करत आहेत. त्यामुळे हवामानाचा फटका सर्वात जास्त हरभरा उत्पादकांना सहन करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाकडून काही मदत मिळण्याची अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांना आहे.

हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव
अति पावसामुळे खरिपातील पिकाचे नुकसान झाले. दुसरा पर्याय म्हणून रब्बी हंगामातील गहू, हरभरा पेरण्यावर भर दिली. मात्र, परिसरात हवामानातील सततच्या बदलामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने त्याचा उत्पन्नात मोठा फरक पडणार आहे.
-किशोर पाटिल बोंद्रे, शेतकरी, शिवपूर

शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा
हवामान बदलामुळे संत्रा पिकाचा आंबिया बहाराचे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. केळीवर सुद्धा करपा आल्याने पाने पिवळी पडत आहेत. गहू, हरभरा पिकांवार सुद्धा रोग आले आहेत. शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी.
-गजानन धर्मे, शेतकरी, अकोली जहागीर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT