cm udhhav thackeray announce 5 lakh help to victim family in who died in nagzira fire in bhandara
cm udhhav thackeray announce 5 lakh help to victim family in who died in nagzira fire in bhandara 
विदर्भ

नागझिरा प्रकल्प आग : मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५ लाखांची मदत, आग विझविताना होरपळून झाला होता मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

भंडारा : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल लागलेल्या आगीतील दुर्दैवी मृत मजुरांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आगीत जखमी वनमजुरांच्या उपचाराचा खर्चही शासन करणार आहे. याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. 

गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कक्ष क्र. ९८, ९९, १००, ९७ येथे आग लागली होती. सदर आग विझविण्याचे काम ५०-६० वन कर्मचारी, अधिकारी व हंगामी मजूर करत होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. पण दरम्यान वाऱ्याचा वेग वाढल्याने आग पुन्हा वाढली. विझविण्याचे कार्य सुरू असता कर्मचाऱ्यांना अचानक आगीने वेढले व पहाडी जागा असल्याने वणवा विझवणाऱ्यांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आणि ३ वनमजुरांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये राकेश युवराज मडावी (वय 40 वर्ष राहणार थाडेझरी), रेखचद गोपीचंद राणे (वय 45 राहणार धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (वय 27 राहणार कोसमतोंडी) यांचा समावेश आहे. तर विजय तीजाब मरस्‍कोले (वय 40 वर्ष राहणार थाडेझरी तालुका सडक अर्जुनी) व राजू शामराव सयाम (वय 30 वर्ष राहणार बोरुंदा) हे दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मरण पावलेले तिघे पहाडावर होते आणि त्यांना आगीने चहूबाजूने वेढले होते. त्यामुळे त्यांना खाली येता नाही आले. त्यांतील एक जण खाली आला त्याला आम्ही वाचवले. या घटनेनंतर आम्ही जबाबदारी झटकणार नाही. मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, त्यावर आमची चर्चा सुरू असल्याचे नवेगाव बंध नागझिराच्या उपसंचालक पूनम पाटे यांनी सांगितले.

कालच्या घटनेत तीन हंगामी मजूर मरण पावले, तर जखमी झालेल्या दोघांना आम्ही नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मरण पावलेले हंगामी मजूर असल्यामुळे शासनाकडून काही मदत मिळण्याची आशा धूसर होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना मदत घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुरविला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 Final Video: अय्यरची विनिंग रन अन् KRR चं गंभीरसह तिसऱ्या ट्रॉफीसाठी जोरदार सेलिब्रेशन, रसेललाही अश्रु अनावर

Kavya Maran KKR vs SRH : हैदराबादच्या मालकीणबाईंच्या डोळ्यात अश्रू तरी दाखवला दिलदारपणा; पाहा VIDEO

Delhi Fire News : विनापरवाना सुरु होतं दिल्लीतलं बेबी केअर हॉस्पिटल; चौकशीत आढळले अनेक गैरप्रकार

Shreyas Iyer : KKR च्या विजयाचं श्रेय श्रेयसचं की गौतमचं? चंद्रकांत पंडितांना विसरून कसं चालेल?

Heatwave : अबब! उन्हाचा पारा ५१ अंशांवर; पुढचे तीन ते चार दिवस रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT