Collector of bhandara district helps children to open account for help
Collector of bhandara district helps children to open account for help  
विदर्भ

महापुरामुळे हरवले आई वडिलांचे छत्र; चिमुकले होते मदतीच्या प्रतीक्षेत; अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार   

दिपक फुलबांधे

लाखनी (जि. भंडारा) : वैनगंगेला आलेल्या महापुराने आईवडिलांचा बुडून मृत्यू झाला. त्यांची अल्पवयीन पाच मुले उघड्यावर आली. त्यांना मदत मिळण्यासाठी बॅंकेत संयुक्त खात्याची गरज होती. परंतु, त्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे सानुग्रह अनुदानाची रक्कम महिना भरापासून पडून होती. बॅंक खात्यासाठी मुलांची भटकंती सुरू होती. त्याबाबत माहिती होताच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पुढाकार घेऊन बॅंक ऑफ इंडियाच्या लाखनी शाखेचे व्यवस्थापक चौधरी यांच्या सहकार्याने संयुक्त बॅंक खाते उघडण्यात आले.

तालुक्‍यातील सिपेवाडा येथील रुपचंद कांबळे 15 ते 20 वर्षांपूर्वी काम शोधण्यासाठी भंडारा येथे गेला होता. टाकळी येथे झोपडीत तो कुटुंबासह राहत होता. मोलमजुरी करून तो व त्याची पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे वैंनगंगेला महापूर आला होता. त्यात रत्नमाला आणि रुपचंद कांबळे या पतिपत्नीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पाणी ओसरल्यानंतर उघडकीस आले. त्यामुळे त्यांचे दुर्गा (वय 17) , सोनू (वय 14), मोनल (वय 11), अमित (वय नऊ) आणि सयोगी (वय सहा) ही मुले अनाथ झाली होती.

नैसर्गिक आपत्तीत पतिपत्नीचा मृत्यू झाल्यामुळे शासनाकडून मृत रुपचंद कांबळे याच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळणार होते. तत्कालीन तहसीलदार रावसाहेब राठोड यांनी आठ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तयारी केली होती. परंतु, या अज्ञान असलेल्या वारसांचे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत संयुक्त खाते नव्हते. याबाबत इकडे तिकडे विचारपूस केली. परंतु, तसे खाते उघडण्यास कोणतीही बॅंक तयार नव्हती. त्यामुळे जवळपास महिनाभरापासून चिमुकल्यांची बॅंकेत पायपीट सुरू होती.

प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे भंडारा जिल्हाध्यक्ष रवी मने व लाखनी तालुका अध्यक्ष सुनील कहालकर हे या चिमुकल्यांना मदत करत होते. याबाबत माहिती होताच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी तहसीलदार रावसाहेब राठोड आणि विधिसल्लागर विलास कान्हेकर यांच्यासोबत चर्चा करून प्रश्‍न समजून घेतला. त्यानंतर बॅंक ऑफ इंडियाच्या लाखनी शाखेचे व्यवस्थापक चौधरी यांना या पाच अल्पवयीन मुलांचे संयुक्त खाते काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संयुक्त बॅंक खात्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून, या पाच भावंडांचे संयुक्त खाते काढण्यात आले आहे.

अशा आहेत अटी

संयुक्त बॅंक खात्यातील रक्कम शेवटचे अपत्य सहा वर्षाचे होईपर्यंत रक्कम काढता येणार नाही. व्याजाची रक्कम काढण्यास मोठी मुलगी तहसीलदार व उपविभागीय महसूल अधिकारी यांची स्वाक्षरीने रक्कम काढण्यात येईल, अशा अटी व शर्ती ठेवून या मुलांचे संयुक्त बॅंक खाते काढले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT