senior citizen.jpg 
विदर्भ

ज्येष्ठांमध्ये वाढताहेत अपचनांच्या तक्रारी; शारीरिक हालचाली मंदावल्या, ज्येष्ठांनी असे द्यावे लक्ष

दत्ता महल्ले

वाशीम : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याचा सोपा उपाय म्हणजे घराबाहेर न पडणे होय. त्यातही लहान मुले व ज्येष्ठांना विषाणू बाधा होण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे या काळात लहान मुलांसह ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ज्येष्ठांचे घराबाहेर पडणेच बंद झाल्यामुळे शरीर जखडल्या जात आहे. त्यामुळे योगप्राणायाम, विविध आसने लाभदायी ठरू शकतात. शारीरिक हालचाली मंदावल्यामुळे ज्येष्ठांमध्ये अपचनाच्या तक्रारी देखील उद्भवत आहेत. त्यामुळे या काळात ज्येष्ठांच्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

दिनचर्या कशी असावी?
प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर प्रथम प्रत्येकाने कोमट पाण्याचे सेवन करावे, शरीर प्रकृती उष्ण असल्यास साधे पाणी प्यावे, मल, मूत्र, घाण विसर्जनानंतर, योगसाधना, सकाळी आठ ते नऊ नंतर थोडासा फलाहार घ्यावा, त्यानंतर दुपारचे भोजन घ्यावे, सायंकाळी सहा ते सात दरम्यान भोजन केलेले उत्तम, झोपताना आपापल्या सोयीनुसार पाणी सेवन करावे. आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागून दीर्घकाळ टिकून राहते.

आहार कसा व किती घ्यावा?
आयुर्वेदात प्रामुख्याने आहाराचे तीन प्रकार आहेत. यामध्ये सात्वीक, तामसिक व राजसिक आहाराचा समावेश आहे. यापैकी सात्वीक आहार हा उत्तम मानला जातो. हा आहार प्रामुख्याने षड्रसात्मक असावा, दुपारच्या जेवनानंतर पाणी, दुपारी ताक, सायंकाळी झोपताना दुधाचे सेवन करावे. अमाशयाच्या चार भागांपैकी दोन भाग अन्नासाठी, एकभाग पाणी व एक भाग रिकामा ठेवावा. आधीचे अन्न पचन झाल्यानंतरच भोजन करावे, शारीरिक नैसर्गीक क्रियांना (मल, मूत्र, विसर्जन) रोखू नये. ऋतुनासार आहाराचे सेवन करावे, ऋतुमानातील फळे सकाळी फळे खाऊ खावीत.

सप्तधातूवर्धक आहार म्हणजे काय?
आहार हा षड्रसात्मक, सप्तधातूवर्धक असावा. सप्तधातूवर्धक म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंचे पोषण होणारा असावा. आयुर्वेदात शाकाहाराला उत्तम मानले आहे.

पाण्याचे सेवन कसे करावे?
आयुर्वेदात भोजनानंतर लगेच पाणी पिणे विषासमान आहे. कारण, त्यामुळे जठराग्नी विझल्या जातो. परिणामी, अन्न सडून गॅस तयार होतो. त्यामुळे भोजनानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे, तर भोजनापूर्वी अर्ध्यातास अगोदर एक ग्लास पाणी प्यावे.

ज्येष्ठांच्या हालचाली मंदावल्या
सध्याच्या काळात ज्येष्ठांच्या हालचाली मंदावल्या गेल्या. त्याचा परिणाम शारीरिक क्रियांवर होतो. अपचनासारख्या तक्रारींवर मात करण्यासाठी आयुर्वेद लाभकारी आहे. आहार कसा, किती व कधी घ्यावा, पाण्याचे सेवन कसे करावे? या सर्व बाबींचे पालन केल्यास निश्‍चितच अपचनाच्या तक्रारी देखील दूर होऊ शकतात.
-भगवंतराव वानखडे, योगप्रशिक्षक, वाशीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे कायद्यानुसार नाही! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल आणि सोनिया गांधींना दिलासा, EDच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

Fake Officer: ४ मैत्रिणी, ३ गरोदर, एक तर २० वर्षांची... पण तो IAS नव्हताच! अटकेनंतर धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांवर

BHC Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत मुंबई, नागपूर व संभाजीनगर खंडपीठात २,३३१ पदांची भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai News: खड्डेमुक्त रस्ते पुरवणे महापालिकांची जबाबदारी, उच्च न्यायालयाचे खडे बोल

SCROLL FOR NEXT