विदर्भ

व्हिडिओ कॉलवर घटस्फोटाची खात्री 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीने व्हिडिओ कॉलद्वारे घटस्फोटाची खात्री दिल्यानंतर पाच वर्षांचा संसार दोघांनीही सहमतीने गुंडाळला. न्यायालयीन प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारानेच घटस्फोट झाल्याचा निर्णय न्यायाधीशांनी जाहीर केला. 

दाम्पत्य उच्चशिक्षित असून दोघेही अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. पती मूळचा नागपूरचा व पत्नी हैदराबादची आहे. 2013 मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांनी काही दिवस गुण्यागोविंदाने संसार केला. दरम्यान, त्यांच्यात मतभेद वाढू लागले. त्यामुळे त्यांना एकत्र राहणे कठीण झाले. पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोट याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणात मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केला. त्यामध्ये दाम्पत्याने आपसी सहमतीने वाद संपवून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नागपुरात येणे अशक्‍य झाल्यामुळे पत्नीने तिच्या सख्ख्या भावाला निर्णयाचे सर्व अधिकार दिले होते. त्यानुसार, पत्नीच्या भावाने व पतीने न्यायालयात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर न्यायाधीश एस. ए. चव्हाण यांनी पत्नी खरेच घटस्फोटासाठी तयार असल्याची व्हिडिओ कॉलद्वारे खात्री करून घेतली. पतीतर्फे ऍड. समीर सोनवणे तर, पत्नीतर्फे ऍड. स्मिता सिंगलकर यांनी कामकाज पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT