congress agitation against agriculture act in yavatmal
congress agitation against agriculture act in yavatmal  
विदर्भ

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचा आझाद मैदानात ठिय्या, जाचक कायदे रद्द करण्याची मागणी

रवींद्र शिंदे

यवतमाळ : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप आहे. या कायद्याविरोधात शेतकरी एकवटले असून, काँग्रेसनेही आंदोलन तीव्र केले आहे. दरम्यान, आज गुरुवारी (ता.तीन)स्थानिक आझाद मैदानात केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

भाजप सरकारने शेतकरीविरोधी कृषी कायदे आणले आहेत. या विरोधात देशाच्या राजधानीत आंदोलन सुरू आहे. काँग्रेसनेही या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शेतकरीविरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. हे काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मागील दोन महिने सातत्याने विविध आंदोलने केलीत. किसान व्हर्च्युअल महामेळावा, किसानहक्क दिवस, जिल्ह्याजिल्ह्यांत धरणे आंदोलन, राजभवनावर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन देण्यात आले. ट्रॅक्टर रॅली काढण्यात आल्या, काळ्या कायद्याविरोधात स्वाक्षरी मोहिमही राबवण्यात आली. त्यात लाखांपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर व कामगारांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर आता काँग्रेसने आणखी लढा तीव्र केला आहे. 

कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी आता देशाची राजधानी दिल्लीत एवटले आहेत. गेल्या सात दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या मनात या कायद्याविषयी काही शंका आहेत. त्यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारने त्यांना आश्वस्त केले पाहिजे. भाजप सरकार जाहीरपणे हे कायदे शेतकरीहिताचे आहेत, असे सांगत आहेत. परंतु, शेतकर्‍यांचे त्यातून समाधान होत नाही. भाजपच्या कथनी व करणीमध्ये अंतर असल्याने शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, बाळासाहेब मांगुळकर, मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, किसान काँग्रेसचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, दिनेश गोगरकर, जफर खान, नरेंद्र ठाकरे, सुरेश चिंचोळकर, अतुल राऊत, संजय ठाकरे, प्रा. बबलू देशमुख, दर्शना इंगोले,पल्लवी रामटेके, मिलिंद रामटेके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT