मोहाडी (जि. भंडारा) : हत्तीडोई येथील गावकऱ्यांनी बंद केलेला सीमा मार्ग. 
विदर्भ

त्यांचा आडवाटेने होतोय प्रवास...नागपुरातून येणाऱ्यांमुळे कोरोनाची भीती

भगवान पवनकर

मोहाडी (जि. भंडारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेंतर्गत आंतरराज्यीय सीमा व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. चेकपोस्ट उभारून पोलिस कडेकोट पहारा देत तपासणी करीत आहेत. परंतु, त्यांच्या डोळ्यात धूळफेक करून अजूनही आडमार्गाने नागपुरातून अनेकांचे आवागमन सुरू आहे. नागपुरात कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही चोरटी वाहतूक भंडारा जिल्हावासींसाठी धोक्‍याची घंटा ठरत आहे.

भंडारा जिल्ह्याच्या सीमा नागपूरला भिडल्या आहेत. मध्य भारतातील मोठी बाजारपेठ असल्याने येथे जिल्ह्यातील नागरिकांचे नेहमीच आवागमन सुरू असते. परंतु, कोरोनामुळे संचारबंदी व टाळेबंदी घोषित झाल्यापासून प्रवासाची सर्व साधने बंद झाल्याने हे आवागमन थांबले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर पोलिस डोळ्यात तेल घालून तपासणी करीत आहेत. त्यामुळे महामार्गाने ये-जा करणे शक्‍य नसल्याने आजूबाजूच्या गावांतून आडवळणाने जाणाऱ्या वाटा जवळ करण्यात येत आहेत. महामार्गाने फक्त जीवनावश्‍यक व अत्यावश्‍यक वस्तूंच्या वाहनांना रहदारीची मुभा आहे. नागपूर येथील भाजीपाल्याची वाहतूकसुद्धा जिल्ह्यात बंद आहे. असे असताना काही जण दुचाकीने तर काही खासगी वाहनाने संधी साधून नागपुरात प्रवेश करीत असल्याचे दिसून येते. काही व्यापारी चोरवाटेने जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत.

हे आहेत आडमार्ग

मोहाडी तालुक्‍यातील सीतेपार झंझाड, पांढराबोडी, काटी, धुसाळा, जांब, कांद्री ही गावे नागपूर जिल्ह्याच्या सीमा रेषेवर आहेत. परजिल्ह्यातील व्यापारी आडमार्गातील गावांतून सहजपणे भंडारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. लॉकडाउन सुरू होताच पोलिस विभागाने जिल्ह्याच्या मुख्य मार्गाची सीमाबंदी केली आहे. सीमाबंदीच्या चौकीवर चोवीस तास पोलिस तैनात आहेत.

बाहेरच्या व्यक्तीचा जिल्ह्यात प्रवेश

जिल्ह्याची सीमा ओलांडून कोणीही बाहेर जाऊ नये व बाहेरचा व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, खात-रामटेक राज्यमहामार्ग, शहापूर, कांद्री-रामटेक, मध्य प्रदेश मार्ग आदी भंडारा जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तरीही नागपूर जिल्ह्यातील लोकांना वायगाव, मुरमाडी मार्गाने भंडाऱ्याच्या सीमेत दाखल होता येते. पांढराबोडी, काटीवरून धानोली, वाकेश्वर मार्ग, धुसाळावरून धानोली, कोदामेडी या आडमार्गानेही नागपूर व कामठी येथील बरीच मंडळी भंडारा जिल्ह्यात पाय ठेवत आहेत.

जनावरांची खरेदी

पश्‍चिमेकडील ही गावे नागपूर जिल्ह्याच्या अगदी टोकावर आहेत. त्यामुळे मौदा, कामठी, नागपूर येथील जनावरांची खरेदी करणारे व्यापारी गाय, म्हशी, शेळ्या विकत घेण्यासाठी जिल्ह्यात दररोज प्रवेश करीत आहेत. नागपूर उपराजधानीत आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 56 झाली आहे. संशयित रुग्णांत भर पडत असल्याने नागपूर डेंजर झोनमध्ये आहे. दरम्यान, चोरवाटांनी तालुक्‍यात येणाऱ्या लोकांच्या मार्फत
कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सुदैवाने जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे.
जिल्हा प्रशासन अत्यंत जबाबदारीने व सजगतेने काम करीत आहे. परंतु, नागपूर जिल्ह्यातून येणाऱ्यांनी मात्र, चिंता वाढविली आहे.

ग्रामस्थांनी अडविले आडमार्ग

पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आडमार्गाचा वापर होत असल्याने ग्रामीण नागरिक कमालीचे दहशतीखाली आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी असे आडमार्ग अडविण्यास पुढाकार घेतला आहे. हत्तीडोई येथील गावकऱ्यांनी भीतीमुळे नागपूरवरून येणारा रस्ता कुंपण घालून बंद केला आहे. नागपूर, कामठीवरून येणाऱ्या व्यापारी व अन्य लोकांची वर्दळ थांबविण्यात यावी. तसेच या आडमार्गावरसुद्धा पोलिस बंदोबस्त लावून सीमा बंद कराव्यात अशी मागणी, नागपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती गावातील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT