विदर्भ

कोरोनाने घेतला २०० शिक्षकांचा बळी; विमा कवच नाही

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाच्या संसर्गाने (coronavirus) राज्यात २०० तर अमरावती जिल्ह्यात १२ शिक्षकांचा मृत्यू (Death of a teacher) झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. अनेक शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस (There is no single dose of vaccine) देण्यात आलेला नाही. कोरोनाबाबतचे काम करताना शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे व जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमित आहेत. (Corona killed 200 teachers)

कोरोना काळात फ्रंट लाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मागणी करूनही लस देण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही, असा आरोप सुद्धा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तांत्रिक मुद्दे पुढे करून लस देणे टाळले गेले. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. खरे म्हणजे, शासनाचे ५ एप्रिल व १३ एप्रिलच्या आदेशात सुद्धा स्पष्ट केलेले आहे की, फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक लस द्यावी. शिक्षक कोरोनाबाधित झाल्यावर त्यांच्या सोबतच्या शिक्षकांना कोविड-१९च्या ड्युटीवर का बोलाविले जाते, असा सवाल करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन्ही लसी दिल्या गेल्या. मग शिक्षकांच्या बाबतीत इतकी अनास्था का? तालुका प्रशासनाकडे फ्रंट लाइनवर काम करणाऱ्या शिक्षकांची यादी आहे. रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षणाला नेमलेले शिक्षक, कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षक ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून काम करत आहेत.

एकमेकांवर बोट दाखवण्याच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे शिक्षकांचे काही जिल्ह्यांत बळी गेले आहेत. इन्शुरन्स कंपनी प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देते. मग शिक्षक या सर्व ठिकाणी काम करीत असताना संपर्कात येत नाही काय? प्रत्यक्ष संपर्कात येऊनही विमा लाभ मिळणार नाही.

मग अशाप्रकारे बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याचे काय? संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली जाते. त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली जाते. लस देण्याबाबत सकारात्मकता दाखविली जाते. परंतु, प्रत्यक्षात काम करत असताना मात्र सुरक्षिततेविषयी सोयी-सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते, असा समितीचा आरोप आहे.

‘त्या’ कुटुंबाला मदत द्या

कोरोनाच्या काळात शासनाने शिक्षकांना विविध कामे दिली आहेत. या कामावर असताना महाराष्ट्रातील सुमारे २०० शिक्षकांचा मृत्यू झाला. या शिक्षकांच्या कुटुंबाची खूप अवहेलना होत आहे. त्यामुळे अशा कुटुंबाला शासनाने ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देऊन कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अशी आमची मागणी असल्याचे प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी राजेश सावरकर यांनी सांगितले.

(Corona killed 200 teachers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT