corona patients decreases in amravati  
विदर्भ

अमरावतीमध्ये कोरोना रुग्णवाढीचा वेग अचानक का मंदावला?

सुधीर भारती

अमरावती : शहरात आणि जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय क्षेत्रासह प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या प्रशासनाने देखील रुग्ण कमी झाल्याची बाब मान्य केली आहे. मात्र, त्याचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही. असे असले तरी कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सर्वच घटकांना प्रभावित करून सोडणाऱ्या कोविड- 19 च्या संक्रमणाचा वेग आश्‍चर्यकारकपणे मंदावल्याचे चित्र मागील काही दिवसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येचा वेग अधिक होता. विशेष म्हणजे अमरावतीचा मृत्यूदर सुद्धा विभागात अधिक होता. ऑक्‍टोबरमध्ये मात्र आश्‍चर्यकारकरीत्या कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाला आहे. जवळपास दीड महिन्यांपूर्वी दररोज 250 ते 300 च्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण येत होते. मात्र, ऑक्‍टोबरमध्ये रुग्णसंख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई, नागरिकांमध्ये स्वतःहून होणारा मास्कचा वापर यासर्व कारणांमुळे रुग्णसंख्या घटल्याचे बोलले जात आहे. 14 ते 20 ऑक्‍टोबरचा आठवडाभराचा कालावधी लक्षात घेता जवळपास 535 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 16 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच यापूर्वी 300 ते 350 रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह येत होते. त्याची सरासरी घटली आहे. 

ग्रामीण भागातही विशेष करून हॉटस्पॉटमध्ये सुद्धा  कोरोनाचा वेग मंदावला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे.  कुठल्याही आजाराचा फैलाव झाल्यानंतर त्याचा 'पिक पिरियड' येतो. त्यामध्ये अनेकांना बाधा होत असते. त्यानंतर हळूहळू तो कमी होत जातो. मागील काही दिवसांची आकडेवारी पाहता कोरोनाची रुग्णसंख्या देखील कमी होत आहे. मात्र, नागरिकांनी गाफिल राहता कामा नये. खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. 
- डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती. 

नागरिकांनी काळजी घ्यावी -
सध्या नवरात्री तसेच त्यापुढील दिवसांत दिवाळीसारखे महत्त्वाचे सण आहेत. सणासुदीच्या या दिवसांमध्येसुद्धा खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. कोरोनाला पोषक असे कृत्य करू नये, असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे. सण साजरे करताना सुद्धा मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळणे गरजेचे आहे. 

टॉप पाच तालुके -
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या सर्वांत जास्त अचलपूर तालुक्‍यात आहे. अचलपूर 37, वरुड व चांदुरबाजारमध्ये प्रत्येकी 14, अमरावतीत 12, अंजनगावसुर्जीत 11, तर मोर्शी तालुक्‍यात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या मृतांची संख्या 351 आहे. 

तारीख (ऑक्‍टोबर) पॉझिटिव्ह मृत्यू 
10 113 01
11 120 03
12 23 02
13 96 03
14 54 04
15 72 04
16 119 04
17  109 02
18 75 01
19  28 01
20 78 01

एकूण रुग्णालय - 17
एकूण बेड- 1565
दाखल रुग्ण- 398
रिक्त बेड - 1164

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT