corona vaccination will be soon in amravati 
विदर्भ

अमरावतीकरांची कोरोनाची भीती होणार दूर, लवकरच होणार लसीकरण

सुधीर भारती

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लस उपलब्ध होणार असून लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. लसीकरणासाठी आवश्‍यक साधनसामग्री व मनुष्यबळ आदी यंत्रणा उभारण्याचे निर्देश टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवाल म्हणाले, की लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी डीप फ्रीजर, आइसलाइन रेफ्रिजरेटर, शीत साखळी केंद्रे, व्हॅक्‍सिन कॅरिअर, कोल्ड बॉक्‍स पॅक आदी साधनसामग्री सज्ज ठेवावी तसेच आरोग्ययंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कुशल मनुष्यबळ नेमून पथके तयार करावी. कोरोना प्रतिबंधक दोन लसींचा डोस आहे. पहिली लस टोचल्यानंतर एक महिन्याने दुसरी लस टोचली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करला लस टोचली जाणार आहे. शासकीय, निमशासकीय आरोग्ययंत्रणा, खासगी आरोग्य यंत्रणेकडील डॉक्‍टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे. त्यानुसार लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्‍चित करावी. लसीकरण पथके तयार करावीत व त्यांना प्रशिक्षण द्यावेत आदी निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयासह 59 प्राथमिक आरोग्यकेंद्रे, 14 ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये, एक वैद्यकीय महाविद्यालय, 13 नागरी आरोग्यकेंद्रे याठिकाणी लसीकरण केंद्रे उघडण्यात येतील. जिल्ह्यात 4 हजार 481 व्हॅक्‍सिन कॅरिअर, 134 डीप फ्रीजर, 133 आइसलाइन रेफ्रिजेरेटर, 255 कोल्ड बॉक्‍स आदी साधने सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली.

लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस टोचली जाणार आहे. त्यासाठी वेबसाईट व ऍपवर लसीकरणासाठी नावनोंदणी करण्यात येणार आहे. नाव, पत्ता, आधारकार्ड अपलोड केल्यानंतर मोबाईल नंबरवर मॅसेज येणार आहे. लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण कळविले जाणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT