lock 
विदर्भ

अमरावतीलगतचे हे शहर पुन्हा होणार "लॉकडाउन'? वाचा कारण

सकाळवृत्तसेवा

अमरावती : अमरावतीलगतच्या उपनगरात कोरोना संक्रमनाने थैमान घातले असून प्रत्येक नागरिकाला असुरक्षित वाटू लागले आहे. या उपनगरातील सर्वदलीय सात नगरसेवकांनी बडनेरा येथे आठवड्याचा लॉकडाउन घोषित करावा, असे साकडे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे व महापौर चेतन गावंडे यांना बुधवारी (ता. 17) निवेदनाद्वारे घातले.

नगरसेवक प्रकाश बनसोड, ललित झंझाळ, इमरान अब्दुल सईद, मोहम्मद साबीर यांच्यासह महिला नगरसेवक इशरतबानो मन्नानखॉं, गंगाताई अंभोरे आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती पापे ठाकूर, जावेद मेमन यांनी ही मागणी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्‍त व महापौरांकडे केली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर गत आठ-दहा दिवसांत बडनेरा उपनगरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. 

सात नगरसेवकांची जिल्हा प्रशासनास आर्त हाक
बडनेराची लोकवस्ती दाटीची असून येथील व्यवहार गावगाड्याप्रमाणे चालतात. त्यामुळे संक्रमण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकूण लोकसंख्येच्या 80 टक्के नागरिक दाट वस्ती व त्यातील जास्तीत जास्त भाग घोषित झोपडपट्टी आहे. या भागात कोरोना विषाणूचे संक्रमण आटोक्‍याबाहेर जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून बडनेरा परिसरात आठ दिवसांचा लॉकडाउन घोषित करावा, अशी मागणी जनतेतूनच होत आहे, असे नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 
जनता कर्फ्यू स्वागताहार्य - जिल्हाधिकारी 
सध्या अनलॉकची अंमलबजावणी होत आहे. महापालिकेच्या सहमतीने कंटेन्मेंट झोनमध्ये उपाययोजना अधिक प्रभावी करता येतील, मात्र पुन्हा लॉकडाउन लागू करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना विचारात घ्याव्या लागतील. जनता महामारीच्या या संकटात स्वरक्षणासाठी स्वतःहून जनता कर्फ्यू पाळत असेल, तर ही भूमिका चांगलीच आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भात पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी; मुळशी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT