cotton damaged due to new disease in amravati 
विदर्भ

शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट, बोंडअळीनंतर कापसावर 'बोंडसड'चे आक्रमण

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : बोंडअळी पाठोपाठ आता बोंडसड या कपाशीवरील नव्या संक्रमणामुळे शेतकरी हादरले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कपाशीच्या पेऱ्यापैकी जवळपास 40 ते 45 टक्के कपाशी या रोगाने कवेत घेतल्याने शेतकरी हादरून गेले आहेत.  विशेष म्हणजे बोंडसड हा बोंडअळीपेक्षाही अधिक घातक असल्याचे खुद्द कृषी विभागाकडून सांगण्यात आल्याने चिंता आणखी वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून कपाशीवरील बोंडअळीने धुमाकूळ घातला आहे. सततचा पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आधीच त्रस्त झालेले असताना आता बोंडसड या नव्या रोगाच्या आक्रमणाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. सातत्याने अतिवृष्टी झाल्याने जमिनीतील बुरशी कापसाच्या बोंडावर येऊन संपूर्ण बोंडच सडवित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कपाशीच्या पेऱ्यापैकी 40 ते 45 टक्के कपाशी बोंडसडने आपल्या कवेत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे लवकर उपाययोजना न झाल्यास 70 ते 80 टक्के कापूस नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे संकट नव्यानेच निर्माण झाल्याने उपाययोजनेबाबत कृषी विभाग सुद्धा हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

बोंडसडचे आक्रमण मोठे असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये याचा समावेश अद्याप झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीमध्ये वाढ होणार आहे. जिल्हापरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्य सुनील डिके यांनी या महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणल्यानंतर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रस्ताव शासनाला पारित करण्याचे आदेश दिले.

बोंडसडचे आक्रमण हे बोंडअळीपेक्षा कितीतरी पटीने भयंकर आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत मिळण्याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
- विजय चव्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK लढतीपूर्वी मोदी सरकारचा मॅसेज, ४ मिनिटांत सूत्र हलली अन् पाकिस्तानी खेळाडूंचा अपमान; हस्तांदोलन प्रकरणात मोठा खुलासा

50 व्या वर्षी अमीषा पटेल बनली आई, म्हणाली...‘मला क्रिकेट टीम जन्माला घालायची होती पण...’

Latest Marathi News Updates : राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

Barshi Crime : ओरिसा राज्यातून १ कोटी ६० लाख रुपयांच्या गांजाचे धागेदोरे; आठ जण कोठडीत, अद्याप तपासाची चक्रे सुरुच

Metro : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा बाणेरपर्यंतचा टप्पा सुरू करा; आयटीयन्सची पीएमआरडीएकडे मागणी

SCROLL FOR NEXT