File photo
File photo 
विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

सकाळवृत्तसेवा

हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. 12) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दिवाकर बाबाराव गेडाम (वय 50) असे मृताचे नाव आहे.
दिवाकर गेडाम शनिवारी जनावरांना चराईसाठी घेऊन गोसेखुर्द कालव्याच्या परिसरात गेला होता. याचदरम्यान शौच लागल्याने तो एका खड्ड्याच्या बाजूला बसला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. दिवाकरसोबत अन्य दोन गुराखी होते. बराचवेळ लोटून दिवाकर आला नसल्याने त्यांनी कालव्याच्या परिसरात त्याचा शोध घेतला तेव्हा दिवाकरचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना देण्यात आली. पोलिस, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त करीत नाही. तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे काहीकाळ येथे तणाव निर्माण झाला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबातील एकाला चौकीदाराची नोकरी देण्याचे आश्‍वासन दिल्याने तणाव निवळला. वाघाला लवकरच पकडण्यात येईल. ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे आश्‍वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मृताच्या कुटुंबीयातील सदस्यांना घटनास्थळी 20 हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर 2 लाख 80 हजार रुपये देण्यात येईल, असे सांगण्यात आले. याप्रसंगी वनविभागाचे बोनगळे, पोलिस निरीक्षक मकेश्‍वर, भाकप नेते विनोद झोडगे, सरपंच जीजा गरमळे, उपसरपंच झरकर, संजय लोणारे, विलास डोंबळे, बिसन गेडाम, प्रभाकर सेलोकर, वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर उपस्थित होते.
पाच महिन्यांत सहा बळी
मागील पाच महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात सहा जण ठार झालेत. वनविभाग फारशा उपाययोजना करीत नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्‍यातील हळदा, आवळगाव, मेंडकी यासह अन्य गावांत वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी याविरोधात आंदोलनही केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT