Crops are damaging due to larvae in Wardha  
विदर्भ

चण्यावर उंटअळीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतातूर; कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी

राहुल खोब्रागडे

पवनार (जि. वर्धा) : गत काही दिवसापांपासून असलेल्या सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. चण्याच्या पिकावर काही ठिकाणी मर रोग, घाटेअळी, उंटअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. वारंवार फवारणी करूनही हा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आता शेतकरी चिंतातूर झालेला आहे.

गहू आणि चण्याच्या पिकाला थंडीचे वातावरण पोषक असते. या काळात पिके चांगली येतात मात्र, काही दिवसातच थंडी पडल्यानंतर वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले हे वातावरण या पिकांकरिता मारक ठरत आहे. चांगले बहरलेल्या पिकाला आता किडरोगाने ग्रासल्याचे दिसत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. खरीप हंगामात सुरुवातीला सोयाबीनवर खोडकीडा, चक्रीभुंगा व कपाशीवर बोंडअळी आल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक गेले. सोयाबीन लागवडीचाही खर्च निघाला नाही तर बोंडअळीमुळे अनेक शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकावर नांगर फिरवावा लागला. याचा सर्व्हे झाला पण, अंद्यापही शासनाकडून कोणतीच मदत .मिळालेली नाही.

वरातीमागुन घोडे हाकण्याचा प्रकार

कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना या किडरोगांचा सामना करण्याकरिता या परिस्थितीत शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात औषधांचा पुरवठा करणे गरजेचे होते. परंतु, अद्याप दरवर्षीप्रमाणे शासनाकडून कुठलेही औषध वा कीडनाशक मिळाले नाही. शासनाचे येथेही वरातीमागून घोडे हाकलण्याचा प्रकार सुरू आहे. किडरोगाने पिके हाताबाहेर गेल्यावर शासन अनुदानित 
शासनाकडून जाहीर केलेली मदत आलीच नाही

बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन पिकाची सुरुवातीपासूनच शाश्‍वती नव्हती. झालेही तसेच सोयाबीनचे पीक हातचे गेले. शासनाने याकरिता शेतकऱ्यांना मदतही जाहीर केली. संबंधित विभागाला आदेश देण्यात आले. त्यानुसार पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अर्जही मागविण्यात आले. मात्र, शासनाकडून अद्याप मदत आली नाही.

सोयाबीन आणि कपाशीचे पीक पूर्णपणे हातचे गेले. त्यामुळे लागवडीचाही खर्च निघाला नाही. हजारो रुपये पाण्यात गेले. तुरीवर काही प्रमाणात भिस्त होती पण, तुरीही पिकल्या नाही. आता चण्याच्या पिकाचेही तेच हाल होते की काय अशी भीती आहे. शासनाने यावर उपाय करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी अपेक्षा आहे.
- सुनील निंबाळकर,
तरुण शेतकरी पवनार 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT