विदर्भ

नागपूरमध्ये रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती, बाळाचा मृत्यू

धक्कादायक! दोन रुग्णालयाने प्रवेश नाकारला तर एका रुग्णालयाने दोन तास टाळाटाळ केली.

नामदेव कुंभार

धक्कादायक! दोन रुग्णालयाने प्रवेश नाकारला तर एका रुग्णालयाने दोन तास टाळाटाळ केली.

उपराजधानी नागपूरध्ये संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. गर्भवती महिलेला प्रसूती कळा होत असताना शहरातील दोन रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. परिणामी रुग्णालयाच्या व्हरांड्यातच महिलेची प्रसूती झाली. यामध्ये बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील डागा या सरकारी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्यामुळे जन्मापूर्वीच चिमुकल्याची हत्या केल्याचा संताप सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. 27 वर्षीय राणी वासणीक या महिलेला प्रसूती कळा व्हायला लागल्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, कन्हान प्रथमिक आरोग्य केंद्र आणि कामटी उपजिल्हा रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. येथून त्यांना नागपूर शहरातील डागा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, इथं पोहचल्यानंतर रुग्णालयाने तब्बल दोन तास प्रवेश नाकारला.

राणी वासणीक यांना प्रसूती कळा जाणवत असतानाही दोन रुग्णालयाने प्रवेश नाकारला. तर एका रुग्णालयाने दोन तास प्रवेश देण्यास टाळाटाळ केली. परिणामी रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती झाली. यामध्ये चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. रुग्णालयाच्या व्हरांड्यातच प्रसूती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संतापजनक घटनेमुळे सरकारी रुग्णालयाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणावर अद्याप रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. राणी वासणिक या मूळच्या नागपूरमधील वाडी येथील राहणाऱ्या आहेत. त्यांचं माहेर नागपूरमधील कन्हान येथील आहे. त्यामुळे गर्भवती असताना राणी वासणिक आपल्या आईकडे कन्हानमध्ये गेल्या होत्या. रविवारी राणी वासणिक यांना प्रसूती कला जाणवायला लागल्या. तेव्हा कुटुंबियांनी त्यांना कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र, तिथून त्यांना कामटी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पण येथेही त्यांना दाखल करुन घेतलं नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नागपूरमधील डागा रुग्णालयात धाव घेतली. डागा रुग्णालयातही दाखल करण्यास दोन तास उशीर केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही हा धक्कादायक प्रकार दिसत आहे. रुग्णालयतील व्हरांड्यातच राणी वासणिक यांची प्रसूती झाली. दुर्देवाने असुरक्षित प्रसूतीमुळे बाळ दगावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील धोकादायक मुसाफिरखाना इमारतीवर महापालिकेची कारवाई; इमारतीचे पाडकाम सुरू

Ahilyanagar News: भीषण आगीत पाच दुकाने खाक ;पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी फाटा येथील घटना

IND vs NZ, 1st Test, Tea Break: बुमराह, आकाशदीप अन् कंबोजच्या धक्क्यांनंतर निकोल्स-फिलिप्सचा पलटवार! न्यूझीलंडचा डाव सावरला

Mahabaleshwar Tunnel Project : महाबळेश्वरमध्ये वांद्रे-वरळी सी-लिंकची झलक! 175 कोटींचा केबल-स्टे पूल पूर्ण; 'व्ह्यू गॅलरी'तून दिसणार कोयनेचा विहंगम नजारा

आई-वडिलांना राजीव गांधींबद्दल सांगण्याची भीती; सोनिया गांधींनी काय केलं? पुस्तकात सांगितला खासगी आयुष्यातील किस्सा

SCROLL FOR NEXT