dates for the marriages afre starting from 30 november this year  
विदर्भ

यंदाची सप्तपदीही कोरोनाच्या चक्रव्यूहात: 30 नोव्हेंबरला पहिला विवाह मुहूर्त

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : गत वर्षी मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लॉकडाउन घोषित झाल्याने मार्चनंतरच्या सप्तपदी वरात ना ब्यांडबाजा, ना मंगलकार्य मोजक्‍या दहा पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडल्या. यंदा विवाह मुहूर्त महिभरावर आले असले तरी अद्यापही राज्यात कोरोनाचे थैमान कायम असल्याने यंदा असलेले 50 विवाह मुहूर्त ही चक्रव्यूहात असल्याचे चित्र आहे.

राज्यात मार्च महिन्यांपासून लॉकडाउन घोषित झाल्याने गत वर्षी मार्च नंतरच्या विवाहावर पुरते विरजण पडले होते. मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत काहीचे विवाह वेळत मुहूर्तावर तर काहींचे जिल्हाबंदीमुळे लांबणीवर पडून उशिराने थातुरमातूर पद्धतीने उरकण्यात आलीत. 

यंदा तुळशी विवाह 26 नोव्हेंबरला असून 30 नोव्हेंबरपासून पुढे विवाह मुहूर्त आहेत. एकूण 50 विवाहाचे मुहूर्त असून सर्वाधिक विवाह मुहूर्त मे महिन्यात (14) आहेत. यंदा गुरू शुक्र असल्यामुळे पौष, माघ व फाल्गुन महिन्यात विवाह मुहूर्त नसल्याचे हिंगणघाट येथील पंचागाचे अभ्यासक शांताराम हिवरकर यांनी सकाळ शी बोलताना सांगितले.

तुळशी विवाह महिनाभरावर असल्याने विवाहोत्सूक वर वधुची शोधमोहीम कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या तरी थंड बस्त्यातच आहे. यापूर्वी धावपळीत वर वधूची जुळलेली विवाह तुळशी विवाहानंतर होणार असली तरी मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीतच सध्या तरी होणार आहे. मंगलकार्यालये मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीतच विवाह उरकवावा लागणार आहे. परिणामी यंदाचीही सप्तपदी कोरोनाचे चक्रव्यूहात अडकणार आहे. विवाह मुहूर्त 30 नोव्हेंबरला प्रारंभ होत आहे. यंदाला 50 विवाह मुहूर्त असून सर्वाधिक विवाह मुहूर्त मे महिन्यात आहेत.

असे आहेत यंदाचे विवाह मुहूर्त

महिना, विवाह मुहूर्त, दिनांक
नोव्हेंबर 1 (30)
डिसेंबर 20 8(7,8,9,17,19,23,24,27)
जानेवारी 21 7(3,5,6,7,8,9,10)
फेब्रुवारी 21 2(15,16)
मार्च21 00 विवाह मुहूर्त नाही
एप्रिल 21 7(22,24,25,26,28,29,30)
मे 21 14(1,2,3,4,8,13,20,21,22,24,26,28,30,31)
जून21 8(4,6,16,19,20,26,27,28)
जुलै 21 3(1,3,13)

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT