या मेलेल्या कोंबड्यांची परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार येथील नागरिक हरिदास नानोटकर यांच्या लक्षात येताच त्यांनी रिद्धपूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आरोग्यसेवक यांना माहिती दिली
या मेलेल्या कोंबड्यांची परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार येथील नागरिक हरिदास नानोटकर यांच्या लक्षात येताच त्यांनी रिद्धपूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आरोग्यसेवक यांना माहिती दिली 
विदर्भ

बापरे! मृत कोंबड्या फेकल्या शाळेच्या आवारात; प्रशासकीय यंत्रणा ठप्प; नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

सचिन डवके

रिद्धपुर (जिअमरावती )  ः मोर्शी तालुक्‍यातील रिद्धपूर येथील काही नागरिक आपला उदरनिर्वाह व्हावा, याकरिता मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा व्यवसाय करतात. मात्र रोगाने येथील गावरानी घरगुती कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्यामुळे येथील नागरिक मेलेल्या कोंबड्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात फेकून देत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या मेलेल्या कोंबड्यांची परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार येथील नागरिक हरिदास नानोटकर यांच्या लक्षात येताच त्यांनी रिद्धपूर येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आरोग्यसेवक यांना माहिती दिली. जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रांगण तसेच अंगणवाडीसमोर मृत कोंबड्या फेकल्या आहेत, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. 

मृत फेकलेल्या कोंबड्यांची पाहणी करून ग्रामपंचायतला पत्र दिले. घरगुती पाळीव कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. मात्र नागरिक खड्डे करून त्या कोंबड्या पुरत नसून त्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फेकून देण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. आपल्या स्थरावरून नागरिकांना यासंदर्भात सूचना देण्यात यावी, असे पत्र ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतला दिले आहे.

मात्र यावर ग्रामपंचायतने कुठलीही कारवाई केली नसल्याने दररोज दोन-चार मेलेल्या कोंबड्या या ठिकाणी आणून टाकण्यात येत आहेत. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

यंत्रणेकडून उदासीनता

सध्या बर्डफ्लूचा सर्वत्र धोका आहे. अशातच येथे अनेक कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने त्यांचे नमूने तपासणीसाठी घेणे आवश्‍यक होते. कोंबड्यांचा मृत्यू कशामुळे होत आहे याचा शोध घेणेसुद्धा आवश्‍यक आहे. मात्र, त्याबाबत यंत्रणेकडून उदासीनता दिसून येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता मनोज वानखडे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाचे पत्र मिळाले आहे. जर यापुढे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या जी. प. शाळेच्या आवारात टाकताना कोणी आढळल्यास त्याच्यावर पोलिस कारवाई करण्यात येईल.
-गोपाल जामठे, 
सरपंच.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महाराष्ट्रात सभा घेतल्या पण मराठा आरक्षणाबद्दल PM मोदी का बोलले नाहीत? CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे कोणाचा पार्टनर? घाटकोपरच्या दुर्घटनेवरून नितेश राणे यांचे गंभीर आरोप

Marathi News Live Update: नाशिकमध्ये गंगाधरी गावाजवळ एसटी-अल्टोचा अपघात; अडीच वर्षांचं बाळ गंभीर जखमी

EPFO: आनंदाची बातमी! EPFOने घेतला मोठा निर्णय; 6 कोटी PF खातेधारकांना होणार फायदा

Rapid and Blitz 2024 : मॅग्नस कार्लसन विजेता! डी. गुकेश अखेरच्या स्थानी

SCROLL FOR NEXT