मूल (जि. चंद्रपूर) : आपल्या अस्तित्व क्षेत्रात भटकंती करणाऱ्या अस्वलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मूल नियतक्षेत्रात रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. मादी अस्वल अंदाजे तीन वर्षांची होती. जबर धडक बसल्याने रेल्वे ट्रॅक शेजारी अस्वल मृत्युमुखी पडून होती. सकाळी वनविभागाच्या गस्ती दरम्यान ही घटना उघडकीस आली. (death-of-the-bear-The-train-struck-Crime-News-Chandrapur-Forest-Department-nad86)
मूलमध्ये नुकतेच वनविभागाच्या परिसरात भटकलेल्या अस्वलीला जेरबंद केले होते. त्या अस्वलीचे ही पिल्ले होती. अस्वलीचा संचार कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणात, रेल्वे स्टेशन परिसर, चरखा संघ आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात नियमित होता. दररोज या अस्वलीचे नागरिकांना दर्शन होत होते. मानवी वस्ती परिसरात भटकत असताना सुद्धा अस्वलीने आजपर्यंत कोणालाही इजा पोहोचवली नव्हती, हे विशेष!
रविवारी पहाटे नियत क्षेत्रात रेल्वे ट्रॅक ओलांडताना मूल मार्गे गोंदिता कडे जाणाऱ्या मालगाडीची धडक अस्वलीला बसली. मूल चिचोली गावाजवळ रेल्वे लाइन पिलर क्रमांक ११९८/९ जवळ ही अस्वल पडून होती. शेपटी जवळ आणि डाव्या बाजूच्या पायाजवळ गंभीर जखमा अस्वलीला झालेल्या होत्या. वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन मौका पंचनामा केला. मृत अस्वलीला शवविच्छेदनासाठी चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात नेण्यात आले.
याआधीही अन्य प्राण्यांचा मृत्यू
या आधीही एका अस्वलीसह तीन पिल्लांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना केळझर वनविभागाच्या हद्दीत घडली आहे. मूलपासून जाणारा गोंदिया बल्लारपूर रेल्वे मार्ग घनदाट वनातून जात असल्याने रेल्वेची धडक बसून पट्टेदार वाघ, अस्वल आणि इतर वन्यजिवांचा मृत्यू याआधीही घडलेल्या आहेत.
(death-of-the-bear-The-train-struck-Crime-News-Chandrapur-Forest-Department-nad86)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.