Industry in akola.jpg 
विदर्भ

Lockdown : उद्योग सुरू मात्र काम बंद; या कारणामुळे उद्योगक्षेत्रावर झाला परिणाम

अनुप ताले

अकोला : जिल्ह्यामध्ये 60 ते 70 टक्के उद्योग सुरू आहेत. मात्र ते केवळ नावालाच! जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाहेरून उत्पादनाची मागणी घटल्याने व मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याने, 'उद्योग सुरू मात्र काम बंद', अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

अकोला जिल्ह्यांमध्ये जवळपास दीड ते पावणे दोन हजार मोठे, मध्यम व लघु उद्योग उभारलेला आहेत. त्यापैकी कृषी आधारित व प्रशासनाने परवानगी दिलेले इतर काही, असे जवळपास 40 ते 50 टक्के उद्योग सुरू असून, औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 60 ते 70 टक्के उद्योग सुरू आहेत.

परंतु बंद असलेले छोटे ट्रान्सपोर्ट, वाहतूक अडचण कच्चामाल मजुरांचा अभाव, यामुळे हे उद्योग नावालाच सुरू असून, विविध अडचणींमुळे त्यामध्ये केवळ 30 ते 40 टक्केच काम होऊ शकतआहे. कामाची गती सुद्धा अतिशय संथ झाली असून, उत्पादन निर्मितीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील उद्योगाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले असून, मागणीअभावी त्यांची स्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे.

उद्योगातील अडचणी

  • छोटे ट्रान्सपोर्ट बंद असल्याने सुटे भाग व किरकोळ वस्तू मिळणे अडचणीचे.
  • बहुतांश कामगार कंटेनमेंट झोन मध्ये अडकले.
  • 70 टक्के परप्रांतीय मजूर कामगार त्यांच्या राज्यात परतले.
  • परराज्यातून परत येणाऱ्या मजुरांची संख्या अत्यल्प.
  • सीजनल उद्योग बंद ठेवावी लागल्याने मोठे नुकसान.
  • शासनाकडून उद्योगासाठी अनुदान, सवलती, नुकसान भरपाई व आर्थिक मदतीचा अभाव.

कामगाराच्या सुरक्षेवर भर
आधीच औद्योगिक क्षेत्र कामगारांअभावी डबघाईस आले आहे. त्यामुळे आहेत तेवढ्या कामगारांची योग्य सुरक्षा घेण्यासाठी उद्योगांकडून भर दिला जात आहे. त्यासाठी कामगारांना सॅनिटाईझ, हँडवॉश, स्वच्छ पाण्याची उपलब्धता करून दिली जात असून, आवारात येणाऱ्या वाहनांची सुद्धा निर्जंतुकीकरण केले जात आहे. गर्दी टाळण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील कॅन्टीन बंद ठेवण्यात आल्या आहेत. मजुरांचे येताना, जाताना, काम करताना, जेवण करताना, फिजिकल डिस्टन्स ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले आहे.

उत्पादनांच्या मागणीत मोठी घट
हॉटेल, समारंभ, कार्यक्रम, सोहळे बंद आहेत. त्यामुळे औद्योगिक उत्पादनांच्या मागणीत मोठी घट आली आहे. शासनाने 'मैत्री पोर्टल'वर अडचणी मागविल्या आहेत. परंतु गेल्या काही महिन्यात उद्योगाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, ते भरून काढणे, हीच मोठी अडचण आहे. मजुरांची संख्या आणि उत्पादनाची मागणी वाढली तरच उद्योगाला गती येऊ शकेल तसेच शासनाकडून उद्योगाला अनुदान, आर्थिक सवलती मिळणे आवश्यक आहेत.
- उन्मेष मालू, अध्यक्ष अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT