suspended.jpg 
विदर्भ

जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत केले असे; म्हणून मिळाला डच्चू

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : जीव धोक्यात घालून कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत आहे. दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस करत बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा करत आहे. परंतु, या आरोग्य यंत्रणेचे महिन्याचे वेतनच विलंबाने झाल्याचा प्रकार बुलडाणा जिल्हा परिषदेत घडला होता. याप्रकरणी सीईओंना तक्रार प्राप्त झाल्यानंतर याबाबत गंभीर दखल घेऊन एकाचे निलंबन तर दोघांची अन्य विभागात बदली करण्यात आली आहे.

सध्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हास्तरासह ग्रामीण भागातील डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना विषाणू विरोधात लढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर्सही अ‍ॅलर्ट राहून सेवा देत आहेत. मात्र, या कोरोना फायटर्सना वेळेत पगार मिळू शकले नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील तीन लिपिकांच्या कामचुकारपणामुळे वेतनास विलंब झाला. अखेर सीईओंनी हे प्रकरण गांभीर्याने घेत वरिष्ठ सहायकास तडकाफडकी निलंबित केले. तर दोघा लिपिकांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

पगारास विलंब होत असल्याबाबत काही तक्रारी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. कोरोना युद्धाच्या काळात सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन होत नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेत काही दिवसांपासून चर्चेत होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने दखल घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ सहायक आस्थापना जयदीप ताठे यांच्यासह लिपिक अनिल पवार व किशोर उबरहंडे यांनी सेवाविषयक बाबींसह डॉक्टरांच्या वेतनासंदर्भात दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीईओंनी जयदीप ताठे यांना निलंबित केले. तर अनिल पवार व किशोर उबरहंडे यांची अन्य विभागात बदली करण्यात आली.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्स, आरोग्य सेवक जिवाची पर्वा न करता अत्यंत बिकट परिस्थिती काम करत आहे. त्यामुळे जिल्ह्याची परिस्थिती उत्तम राहण्यास मदत होत आहे. कार्यालयीन कर्मचारी किंवा व्यक्तींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास दिला व तशी तक्रार प्राप्त झाल्यास निलंबन किंवा बडतर्फ करण्याची कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट संकेत प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT