file photo 
विदर्भ

झुडुपी जंगलात वाघोबाची भ्रमंती

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. देशविदेशांतील पर्यटक केवळ आणि केवळ वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला येतात. ताडोबा जंगलात वाघांची संख्या आता वाढली आहे. जागा कमी पडू लागल्याने वाघोबा नवीन जागेच्या शोधात ताडोबा परिसरालगत असलेल्या गावांत फिरत आहे. चंद्रपूर शहराला लागूनच ऊर्जानगरचा भाग आहे. झुडुपी जंगल, आवडते खाद्य वाघोबाला मिळत आहे. याच कारणामुळे एका वाघोबाने या भागात आपले बस्तान मांडले आहे. रविवारी (ता. 15) सकाळच्या सुमारास या मार्गाने ये- जा करणाऱ्यांना या वाघाने आपले दर्शन दिले. 


वीज केंद्राच्या मार्गावर झुडपी जंगल

चंद्रपूर शहराला लागूनच महाऔष्णीक वीज केंद्र आहे. चंद्रपूर ते महाऔष्णीक वीज केंद्राच्या मार्गावर झुडपी जंगल आहे. याच परिसरातून नाला वाहतो. अस्वल, रानडुकर, हरण, सांबर, चितळ यासह अन्य वन्यप्राण्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. आता त्यात वाघाची भर पडली आहे. वाघोबाला आपले आवडते खाद्य मिळत आहे. त्यामुळे वाघाने आपला मुक्काम या भागात वाढविला आहे. जवळपास एक-दीड महिन्यांपासून सातत्याने याच परिसरात वाघ फिरत आहे. पंधरा दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वाघासोबत त्याच्या फॅमिलीचे दर्शन अनेकांना झाले होते. त्याचा व्हिडिओही सोशल माध्यमावर व्हॉयरल झाला.

नागरिकांत भीतीचे वातावरण 

दिवसाढवळ्या या भागात वाघ दिसत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाघ गायीच्या मागे धावतपळत राष्ट्रवादीनगरातील नागमंदिर परिसरात आला. तेव्हा याच भागात काही महिला सरपण गोळा करीत होत्या. महिलांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे वाघोबाने तेथून धूम ठोकली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तेथे आले. त्यांनी फटाके फोडले. रविवारी याच परिसरातील झुडपी जंगल जाळण्यात आले. 

बोर, मोहफुल प्रेमात पडली अस्वल 

ऊर्जानगरच्या झुडपी जंगलात बोर, मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहे. बोर, मोहफुल अस्वलीस मोठ्या प्रमाणावर आवडते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर अस्वली दिसून येत आहे. ऊर्जानगरला लागून असलेल्या प्रवेशद्वार छोटे उद्यान आहे. याच परिसरात अनेकांना अस्वल दिसून आली.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT