Tukdoji Mahara 
विदर्भ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीने धरलाय आता जोर 

नरेश इंगळे

शेंदूरजनाबाजार (जि. अमरावती) ः वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना गेल्या १७ वर्षांपासून भारत सरकार ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय घेत नसल्यामुळे येत्या गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी गावागावांतून सामाजिक संस्था, संघटना, युवक संघटना व सर्व स्तरांतून पंतप्रधानांना निवेदने पाठविण्यात येणार आहेत. यादिवशी दुपारी ४.५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना घराघरांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. 

निवेदने पाठविण्याचे हे अभियान २० जानेवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक, राष्ट्रीय व विश्‍वव्यापी कार्य लक्षात घेता त्यांना ‘भारतरत्न’ सन्मान त्वरित द्यावा, अशी मागणी सर्वत्र होत आहे. या मागणीची त्वरित दखल घेण्यात यावी, अशी जनसामान्यांची भावना आहे. भारतात साहित्य, समाजसेवा, ज्ञान-विज्ञान, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘भारतरत्न’ सन्मान दिला जातो. मागील वर्षी कुणालाही हा सन्मान देण्यात आला नाही. यापूर्वी किमान ४५ लोकांना हा सन्मान देण्यात आला. दहापेक्षा जास्त व्यक्तींना मरणोत्तर देण्यात आला. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ‘भारतरत्न’ सन्मान मिळावा ही मागणी २००३ पासून सातत्याने सुरू आहे. १७ वर्षांच्या कालावधीत मागील कॉंग्रेस सरकार व आताचे भाजप सरकार या दोन्ही सरकारच्या कार्यकाळात अनेक निवेदने, ठराव, पत्रे जनतेकडून व खासदार, आमदारांकडून गेलेली आहेत.

महाराष्ट्र शासनाची शिफारस झाली. या मागणीचा प्रस्ताव पंतप्रधान राष्ट्रपती यांच्याकडे पाठवितात व नंतर घोषणा होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी लोकांची ही मागणी आहे. त्यावर पंतप्रधानांनी त्वरित निर्णय घ्यावा, यासाठी ५ नोव्हेंबर २०२० ला ही निवेदने पाठविण्यात येत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचारमंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापाचा वाद पोरावर राग! रिक्षातून ओढून धुणे धुतल्यासारखं ४ वर्षीय मुलाला मारहाण, मुंबईतील अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ...

मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रॉडकास्ट इंजिनियरचा मृत्यू; हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

Satara News: सातारा जिल्हा रुग्णालयात चक्क मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांचा संताप अनावर, महिन्याभरात दुसरी घटना, नेमकं काय घडलं!

Fridge Safety Tips : फ्रीजचा ब्लास्ट! उन्हाळ्यात अजिबात करू नका 'या' 4 चुका; नाहीतर बॉम्बसारखा फुटेल रेफ्रिजरेटर

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT