Disputes in Gosekhurd resettled villages, warning of citizens Movement 
विदर्भ

भंडारा जिल्ह्यातील दोन गावांत ‘तुझं माझं जमेना', काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

दीपक फूलबांधे

भंडारा  : गोसुखर्द धरणाच्या बुडित क्षेत्रातील वडद व जामगाव या दोन गावांचे एकत्र पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यातच अत्यंत कमी दर्जाची कामे पुनर्वसन ठिकाणी केल्याने गावकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. या दोन्ही गावांना स्वतंत्र अस्तित्व हवे असल्याने त्यांनी ठिय्या आंदोलन करून आपला विरोध दर्शविला. 15 दिवसांत याबाबत योग्य निर्णय झाला नाही तर, जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे. 

एकेकाळी 700 लोकसंख्येचे गाव स्वतंत्र होते. परंतु, गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पबाधित झाल्याने त्याची आता जामगाव-वडद पुनर्वसन अशी नव्याने ओळख निर्माण झाली. जामगाव या गावाशी जोडताना प्रशासनाने दोन्ही गावांतील गावकऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही. या दोन्ही गावांचा एक होण्यास विरोध आहे.

शासनाने लादलेली पंचायत निवडणूक, त्यांच्यात काही समाजविरोधी लोकांनी बिनविरोधात पदे बळकावली. यामुळे दोन्ही गावाच्या वादाला सुुरुवात झाली. ग्रामसभेच्या ठरावाला न जुमानणे, लोकांशी गैरवर्तणुकीने वागणे, तसेच झालेल्या कामाचा जमा-खर्च न देणे, अशा अनेक तक्रारीने ग्रासलेल्या गावाचा न्यायासाठी संघर्ष केविलवाणाच संघर्ष सुरू आहे. 

दोन्ही गावांचा सामाजिक सलोखा बिघडून भांडण तंटे व जातीय भांडण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पुनर्वसन करण्यात आलेल्या गावठाणात 18 नागरी सुविधेअंतर्गत चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, सिमेंट नाल्या आणि 24 तास विजेची अपेक्षा होती. परंतु ही कामे होताना मोठा भ्रष्टाचार झाला असून, दोन महिन्यातच डांबरी रस्ते उखडले.

नाल्यांत गढूळ पाणी साचल्यामुळे गंभीर आजार होत आहेत. विजेचे खांब पूर्णपणे वाकले असून, काही ठिकाणी तुटलेल्या तारांमुळे गावकऱ्यांना जीवित हानीचा धोका संभावतो. पुनर्वसन झाल्यापासून अजूनही बऱ्याच लोकांना शेती, घरांचा मोबदला मिळाला नाही. भूखंड न मिळाल्यामुळे हे प्रकल्पग्रस्त जनावरांसारखे जगत आहेत.

आतातरी शासनाने लक्ष देऊन दोन्ही गावांच्या भविष्याचा विचारा करावा आणि दोन्ही गावकऱ्यांच्या समस्या निकाली काढाव्यात म्हणून गावकऱ्यांना विश्‍वासात घेऊन न्याय द्यावा. तसेच गावकऱ्यांचा विरोध असताना निडणूक लढवली व निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पदमुक्‍त करण्यात यावे, 18 नागरी सुविधेअंतर्गत होणाऱ्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, यांसारख्या मागण्यांसाठी जामगाव-वडद येथील प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केले. त्यांनी याबाबत 15 दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही तर, जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

राजकीय खेळीमुळे नाराजी

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान गावकऱ्यांनी आपल्या मागण्या रेटून बहिष्काराचे शस्त्र उगारले होते. याचा फायदा घेऊन राजकीय नेत्यांनी आपली खेळी खेळून पदाधिकाऱ्यांची अविरोध निवड करवून घेतली. आता पदाधिकारी कुणाचेही ऐकूण घेत नाही. हीच बाब येथील गावकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. यातूनच वेगळ्या गावाची मागणी समोर आली आहे. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT