विदर्भ

पालकत्व गमावलेल्या बालकांवर मायेची फुंकर; डॉक्टर दांपत्य करणार मोफत उपचार

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनामुळे (Coronavirus) अनेक चिमुकल्या बालकांना न कळत्या वयात आईवडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला. पालकत्व गमावलेल्या बालकांसमोर (Orphan Children) अनेक प्रश्‍न उभे ठाकले आहेत. यवतमाळ (Yavatmal district) येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मानकर व डॉ. लीना मानकर यांनी मायेची फुंकर घालत निराधार बालकांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डॉ. मानकर दाम्पत्याने सैनिकांच्या पाल्यांना मोफत उपचाराची सुविधा दिली आहे. (Doctor Mankar from yavatmal will treat corona orphan children for free)

कोरोनाने सर्वांचे जीवनच बदलून टाकले. कुणाचे आईवडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा जग सोडून गेलेत. तर, चिमुकल्यांचे आईवडील दोघेही तर, कुठे वडील, आईने कोरोनामुळे अखेरचा श्‍वास घेतला. कोरोनाच्या संसर्गात चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. याच काळात पालकत्व गमावलेल्या बालकांना दत्तक देण्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.

याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. तर, पालकत्व हिरावलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय डॉ. मानकर दाम्पत्याने घेतला आहे. डॉ. मानकर नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सेवाभावी डॉक्‍टर म्हणून त्यांना ओळखले जाते. कोरोनात डॉक्‍टरमंडळी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून अहोरात्र झटत आहेत. त्यातही काही डॉक्‍टर कोरोना "कॅश' करीत असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

याच संकट काळात डॉ. मानकर दाम्पत्याने घेतलेल्या मोफत उपचाराच्या निर्णयामुळे माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. दोन वर्षांपासून डॉ. मानकर सैनिकांच्या पाल्यांवर अशाच प्रकारे उपचार करतात. डॉ. मानकर दांपत्याच्या निर्णयामुळे निराधार बालकांना उपचाराचा आधार मिळणार आहे.

कोरोनाने माणसाला खूप काही शिकविले आहे. पालकांचा मृत्यू झाल्याने मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, असे वाटते. नवजात बालकांपासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर मोफत उपचार करण्यात येईल.
-डॉ. स्वप्नील मानकर, बालरोगतज्ज्ञ, यवतमाळ

(Doctor Mankar from yavatmal will treat corona orphan children for free)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : चोरीच्या पैशातून चंगळ, ६ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, १० वर्ष जंगलात लपून बसला; सराईत बाईकचोराला अशी झाली अटक

Latest Marathi Breaking News : शिवसेनेला मोठा धक्का; अजून काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

Hotstar सब्स्क्रिप्शन पूर्णपणे फ्री! सोबत मिळणार 15GB डेटा, काय आहे हा धमाकेदार प्लॅन? जाणून घ्या

Mumbai CNG crisis: कसं होणार मुंबईचं? सीएनजी तुटवड्याने थबकली... ऑटोचं भाडं किती वाढलं? विमानतळावर जाण्यासाठी कॅबसुद्धा नाही

Gadhinglaj News: गडहिंग्लजमध्ये चार पक्षांची महाआघाडी एकत्र; राष्ट्रवादीविरोधात रंगणार थरारक लढत!

SCROLL FOR NEXT