Medicines
Medicines 
विदर्भ

धक्कादायक! आरोग्य केंद्राचा औषधसाठा सापडला डॉक्टरच्या निवासस्थानी 

सुधीर भारती

अमरावती ः मेळघाटातील महत्त्वाच्या अशा धूळघाटरेल्वे प्राथमिक आरोग्यकेंद्रातील औषधसाठा एका बंद क्वार्टरमध्ये आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही औषधी मुदतबाह्य झालेली असून रुग्णांना वाटप न केल्याने ती तशीच पडून राहिली. या संतापजनक प्रकाराबाबत आरोग्य विभागाकडून मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे. धूळघाटप्रमाणेच अन्य आरोग्य केंद्रांमध्येसुद्धा असाच प्रकार होत असावा याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य प्रकाश साबळे यांनी धूळघाटरेल्वे येथील आरोग्यकेंद्र परिसराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरोग्यकेंद्राच्या परिसरात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बंद असलेल्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यामध्ये औषधांचा साठा आढळून आला. विशेष म्हणजे, आढळलेली औषधी मुदतबाह्य झालेली होती. ठराविक मुदतीमध्ये आरोग्य केंद्रातील ओपीडीमधून या औषधींचे वितरण गरजू रुग्णांना होणे आवश्‍यक होते, मात्र स्थानिक वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा औषधसाठा बाहेर काढण्यात आलाच नाही.

साबळे यांनी या प्रकाराचे चित्रीकरण करून आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यानंतर कुठे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सहायक आरोग्य अधिकारी पांडे व औषधी निर्माता वारकरी या दोघांना तपासणीसाठी धूळघाटरेल्वे येथे पाठविण्यात आले. एकाच दिवसात संपूर्ण अहवाल घेऊन ही चमू जिल्हा मुख्यालयी परतली. 

झालेला प्रकार हा अतिशय संतापजनक आहे. रुग्णांना औषधांचा पुरवठाच केला जात नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. जिल्ह्यातील अन्य आरोग्य केंद्रांचीही अशीच तपासणी झाली पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण आता हा मुद्दा विधिमंडळात उचलून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत पाठपुरावा करणार आहोत. 
- प्रकाश साबळे, आरोग्य समिती सदस्य, जिल्हा परिषद.   

याप्रकरणी आम्ही सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपविली आहे. दोन ते तीन दिवसात याबाबतचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर वस्तुस्थिती जाणून पुढील कार्यवाही केली जाईल.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT