Doctor saved life of a new born by making surgery 
विदर्भ

डॉक्टरांच्या रुपात त्यांना भेटला देवदूत, नवजात बालिकेवर केली शस्त्रक्रिया

दिनकर गुल्हाने

पुसद, (जि. यवतमाळ) : येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांच्या नवजात बालिकेला श्‍वसनाचा त्रास असल्याने डॉक्‍टरांनी नागपूर येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. मात्र, 'लॉकडाउन'मुळे आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या तिच्या पालकांना ते शक्‍य नव्हते. अशास्थितीत पुसद येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने उपचारासाठी आधार दिला. दुर्मिळ अशा 'डायफ्रॅमॅटिक हर्निया'वर हिंगोली येथील पेडियाट्रिक सर्जन डॉ. आशीष झडपे व त्यांच्या चमूने तातडीने शस्त्रक्रिया करून त्या नवजात बालिकेचे प्राण वाचविले.

डॉक्‍टरांच्या अथक प्रयत्नातून सुखरूप वाचलेल्या या गोंडस बालिकेचे वडील अनिल चव्हाण व आई मालू हे शेतमजूर असून मोरवाडी (ता. महागाव) येथील रहिवासी आहेत. खरेतर कुडाच्या घरात पहिलाच पाळणा हलणार म्हणून आई-वडील मनोमन खुश होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारे जग चिंतित असताना 'लॉकडाउन'मध्ये बाळंतपण कसे करावे? हा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. त्यांनी कसेबसे पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. 23 एप्रिल रोजी या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले. मात्र, पुढ्यात नवीन संकट उभे ठाकले. नवजात बालिकेला श्‍वसनाचा त्रास होत असल्याचे लक्षात येताच बालरोग तज्ज्ञांनी तपासणी केली व पुढील उपचारासाठी बालिकेला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. या प्रकाराने आई-वडील क्षणभर घाबरून गेले. आर्थिक स्थिती सक्षम नव्हती आणि त्यात लॉकडाउन. त्यामुळे नागपूरला जाणे अशक्‍य वाटत होते. अशा स्थितीत पालकांनी पुसद येथील मल्टिकेअर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुजित चिलकर यांनी बालिकेची तपासणी केली. बालिकेचे आतडे, जठर, पानथरी हे अवयव पोटातून छातीत घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले. एक्‍स-रे व सोनोग्राफी तपासणीमधून 'डायफ्रॅमॅटिक हर्निया'चे निदान करण्यात आले. या अवस्थेत हृदयावर दाब येत असल्याने बालिकेला श्‍वसनाचा त्रास होत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्‍टरांनी व्यक्त केली. डॉक्‍टरांनी तिच्या पालकांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्यांनी लगेच हिंगोली येथील पीडियाट्रिक सर्जन डॉ. आशीष झडपे यांच्याशी संपर्क साधला. लॉकडाउनच्या काळात सर्वत्र संचारबंदी असताना डॉ. झडपे यांनी पुसद गाठले. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुजित चिलकर, डॉ. सचिन थोरकर व भूलतज्ज्ञ डॉ. आनंद कोमावार व चमू यांच्या सहाय्याने ता. 26 रोजी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया दीड तासात यशस्वीरीत्या पूर्ण केली. नंतर बालिकेला चार दिवसापर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. औषधोपचाराने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली व गुरुवारी (ता. सात) तंदुरुस्त बालिकेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी तिच्या आई-वडिलांनी डोळ्यात आसवे आणत देवस्वरूप डॉक्‍टरांचे आभार मानले. या बालिकेचे उपचारासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा तिच्या पालकांना लाभ देण्यात आला.

बालिकेला जीवनदान
श्‍वसनाचा त्रास होत असल्याने नवजात बालिकेची प्रकृती गंभीर होती. दुर्मिळ असलेल्या 'डायफ्रॅमॅटिक हर्निया'ची 'लॉकडाउन'च्या परिस्थितीतही वेळेत यशस्वी शस्त्रक्रिया करता आली. यासाठी शिशू शल्यचिकित्सक डॉ. आशीष झडपे  यांची मोलाची मदत झाली. मृत्यूच्या कराल दाढेतून बालिका बाहेर आल्याने तिच्या पालकांना आनंद झाला आहे.
- डॉ. सुजित चिलकर, बालरोगतज्ज्ञ, मेडिकेअर हॉस्पिटल, पुसद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT