Doctors examine patients from mobiles
Doctors examine patients from mobiles 
विदर्भ

डॉक्टरांनी काढली अफलातून शक्कल, मोबाईलवर तपासल्या जातात रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा): जगभरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पाहता राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या लढाईत डॉक्टरांची विशेष भूमिका आहे. मात्र असे असले तरी संग्रामपूर तालुक्यात अनेक खासगी डॉक्टर रूग्णांना फोनवरूनच आजाराची लक्षणे विचारून औषधोपचार करीत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी एकीकडे यंत्रणा सज्ज असल्या तरी ग्रामीण भागात किरकोळ आजारांसाठी रुग्णांना भटकावे लागत आहे. वरवट बकाल येथे डॉक्टरांनी चक्क भेटण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. मात्र, अनेकदा रुग्णांना याचा त्रास होतो. संग्रामपूर तालुक्यात अनेक खासगी डॉक्टर रूग्णांना फोनवरूनच आजाराची लक्षणे विचारून औषधोपचार करीत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच रुग्णांना चुकीचे औषध दिल्या गेल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अशावेळे खासगी डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा म्हणून शासकीय आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. खासगी डॉक्टरांच्या मनमानी व्यवहारामुळे अनेक रुग्णांना अडचणी निर्माण होत असल्या तरी समाजहीत साधण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या डॉक्टरांची संख्याही मोठी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT