Animal
Animal 
विदर्भ

डॉग, कॅटला स्वेटर दिसेल ट्रेण्डी

प्रशांत रॉय

नागपूर - पावसाळा संपून आता हिवाळ्याला प्रारंभ झाला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेतली तर निश्‍चितच पशुपालकांची डोकेदुखी कमी होते. विशेषतः डॉग आणि कॅट यांना स्वेटर किंवा कोट घातल्यास त्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत मिळते शिवाय मेट्रो सिटीमध्ये आधुनिक शैलीला अनुसरून ते ट्रेण्डीही दिसून येते व वेगळा असा रुबाबही मिरविता येतो.

अंगावरील वाढीव केस आणि इतर नैसर्गिक उपाययोजनांमुळे प्राण्यांना थंडी वाजत नाही असा समज आहे. वातावरणानुसार अनुकूलन करण्याची प्राण्यांमध्ये क्षमता आहे. तरीही गाय, म्हैस, श्‍वान, मांजर, पोपट आदी पाळीव प्राण्यांना कडक थंडीचा त्रास होतो. थंडीच्या दिवसांत चारचाकी वाहनांखाली पहुडणे श्‍वान, मांजरींना आवडते. इंजिन गरम असल्यामुळे ऊब मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असते. अशावेळी लक्ष न देता अचानक वाहन सुरू केल्यास या प्राण्यांना इजा संभवते. थंडी वाढल्यास स्वतःच्या शरीराचे नॉर्मल (सामान्य) तापमान कायम ठेवण्यासाठी प्राण्यांना नेहमीपेक्षा अधिक श्रम करावे लागतात. आपले पाळीव प्राणी बाहेर अधिक वेळ घालवीत असतील तर त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने जास्त प्रोटिनयुक्त आहार देणे गरजेचे ठरते. विशेषतः परदेशी कूळ असलेले श्‍वान आणि मांजर यांच्याकडे अधिक लक्ष देणे आवश्‍यक आहे, असे पशुवैद्यांचे म्हणणे आहे.

निसर्गाने श्‍वान, मांजर यांसह सर्व प्राण्यांना प्रत्येक ऋतूमध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केलेली आहे. यामुळे पाऊस, ऊन किंवा थंडीच्या काळात त्यांना वातावरणाशी जुळवून घेण्यात वेळ लागत नाही. लहान पिल्ले, बछड्यांची मात्र थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. कोमट पाण्याने १५ दिवसांतून एकदा डॉग, कॅटची आंघोळ करावी.
- डॉ. गौतम भोजने, सहायक प्राध्यापक, नागपूर व्हेटरनरी कॉलेज

पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा - डॉ. विनोद धूत
यंदा थंडीची सुरुवात दीपावली सणाच्या मुहूर्तावरच झाली आहे. श्‍वान, मांजर, पोपट आदी पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आवश्‍यक आहे. थंडीपासून बचावासाठी घरात ऊबदार वातावरण राहील असा प्रयत्न करावा. कडाक्‍याच्या थंडीने प्राण्यांना जॉइन्ट पेन (सांधेदुखी)चा त्रास होतो. जास्त वय असलेले श्‍वान आणि मांजरांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. अशावेळी पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विनोद धुत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT