तुमसर : कारला धडक देत रस्त्यालगत उभ्या लोकांना चिरडणारे मालवाहू वाहन.  
विदर्भ

चालकाला लागली डुलकी अन्‌ घडले आक्रित... 

सकाळ वृत्तसेवा

तुमसर (जि. भंडारा) : मालवाहतूक वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात जणांना चिरडले. यात तिघा जणांचा मृत्यू झाला; तर चौघे जण जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. 5) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तुमसर-बपेरा- बालाघाट आंतरराज्य मार्गावर मोहाड येथे घडली.

मृतापैकी दोन मध्य प्रदेशातील मोहाड येथील रहिवासी असून, एक जण भंडारा जिल्ह्यातील काटी (ता. मोहाडी) येथील रहिवासी आहे. 


अन्‌ वाहन अनियंत्रित झाले 

मालवाहू वाहनातून नागपूरवरून भाजीपाला भरून बालाघाट येथे नेला जात होता. चालकाचे डोळे लागल्याने वाहन अनियंत्रित झाले. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक देत शेजारी उभ्या असलेल्या सात जणांना वाहनाने धडक दिली. 

तिघांचा मृत्यू 

यात शांतीलाल माहुले (वय 45), अमित मते (वय 20) रा. मोहाड (मध्य प्रदेश) व मंगल बुद्धे (वय 28) रा. (काटी/ पांढराबोडी, ता. मोहाडी) हे तिघे जागीच ठार झाले. शिवम प्रकाश (वय 15), हेमराज शेंडे (वय 18), नीलेश मते (वय 12), श्रेया आठवडे (वय 16) सर्व रा. मोहाड हे गंभीर जखमी झाले. 

जखमींवर रुग्णालयात उपचार 

जखमींवर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT