lightning 
विदर्भ

पाऊस आल्याने ते थांबले झाडाखाली, अन्‌ वीजरुपी काळाने घातली झडप... 

मोनील देशमुख

नागभीड, तळोधी (जि. चंद्रपूर)  : नागभीड तालुक्‍यात दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचावासाठी नवोदय विद्यालय फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली अनेकजण उभे होते. तेथेच वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, चौघे गंभीर जखमी, तर 15 ते 17 जण किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 13) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अशोक कवडू तिरमारे (वय 54, रा. वलनी) आणि लोकचंद रामू पोहनकर (वय 12) यांचा समावेश आहे. 

नागभीड तालुक्‍यातील अनेक भागांत दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. नवोदय विद्यालय फाट्याजवळ अनेकांची शेती आहे. पाऊस जोरदार सुरू झाल्याने शेतकाम करणारे, वाहनधारक नवोदय विद्यालयाजवळ असलेले हॉटेल तसेच बसथांब्यामध्ये थांबले होते. तेव्हाच वीज कोसळली. त्यात अशोक कवडू तिरमारे, लोकचंद पोहनकर यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील श्‍यामराव बोरकर (रा. गिरगाव), मोरेश्‍वर दयाराम मडावी (रा. वलनी), गोपीचंद वासेकर (रा. वलनी), भास्कर किसन देशमुख (रा. तळोधी) हे जखमी झाले. 

लोकचंद हा मुलगा आजीच्या गावावरून मामासोबत सोनुर्लीकडे जात होता, तर अशोक तिरमारे हे शेतीच्या कामावर गेले होते. पाऊस लागल्याने दोघेही नवोदय फाट्याजवळ थांबले होते. चार जखमींना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 15 ते 17 किरकोळ जखमींची तपासणी करून त्यांना सुटी देण्यात आली. याच तालुक्‍यातील मांगरुड येथे वीज पडून महानंदा जीवतोडे ही महिला जखमी झाली. तिला तळोधी येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. 

संपादन  राजेंद्र मारोटकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT