police.jpg 
विदर्भ

संतापजनक : लाॅकडाउनमध्ये ऑन ड्यूटी पोलिस कर्मचार्‍याला मारहाण, पहा कुठे घडलाय हा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : कोरोना संकट काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांचा संपूर्ण देश आणि सर्व समाजघटक गौरव करीत असताना एका पोलिस कर्मचार्‍याला गावगुंडांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना काल, सोमवारी रात्री 8 वाजेदरम्यान येथील हुसैनिया मस्जीद चौकात घडली. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

येथील हुसैनिया मस्जीद चौकात पोलिस कर्मचारी राजेश निकाळजे नेमून दिलेली ड्यूटी करीत होते. सोमवारी (ता. 4) रात्री 8 वाजेदरम्यान 5 ते 6 जण मोटारसायकलवर फिरताना निकाळजे यांना आढळले. लॉकडाऊन असताना आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कालावधी संपलेला असताना कुणालाही बाहेर पडता येत नाही. त्यातच मोटारसायकलस्वार तरुणांनी तोंडावर  मास्क घातलेला नव्हता. 

पोलिस निकाळजे यांनी तरुणांना हटकले आणि घरी जाण्याचे सांगितले. पण तू कोण आम्हाला अडविणारा.. आम्ही कुणालाही घाबरत नाही, या शब्दांत या उडाणटप्पू युवकांनी पोलिसाला अश्‍लील शिवीगाळ करण्यात सुरवात केली. यातील एकाने धमकी दिली की, तो नगरसेवकाचा भाऊ आहे.. तुला पाहून घेऊ.. यानंतर निकाळजे यांनी पोलिस स्टेशनला फोन केला तर या सहा तरुणांनी त्यांना मारहाण करण्यात सुरवात केली. एकाने कॉलरही पकडली तर आणखी एकाने त्यांच्या हातातील काठीही हिसकावली. 

काही वेळाने इतर पोलिस त्याठिकाणी पोहोचले. मुख्य आरोपी जावेदसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर फरार आहेत.  लॉकडाऊनची संचारबंदी असताना फिरणे, पोलिसाच्या कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ आणि धमकी देणे, तोंडावर मास्क न बांधणे, दंगा करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणे, अशा विविध कलमान्वये आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पोलिस कर्मचार्‍याला मारहाणीचा सर्वत्र निषेध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT