Ear cut off for harassing sister 
विदर्भ

साळ्याने कापला भाऊजीचा कान

साईनाथ सोनटक्के


चंद्रपूर  : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून संतापलेल्या साळ्याने चक्क भाऊजीचा चाकूने कान कापल्याची घटना येथील श्‍यामनगरात 3 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. यात भाऊजी जखमी झाला असून, रुग्णालयात उपचार सुरू आहे. साळ्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील श्‍यामनगरात एक कुटुंब राहते. या कुटुंबातील मुलीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. ती पतीसह याच शहरातच राहते. त्यांच्या संसारवेलीवर तीन फुले उमलली. काही वर्षे सुखात गेल्यानंतर आता त्या मुलीला नवऱ्याकडून त्रास सुरू होता. पतीकडून शारीरिक, मानसिक त्रास होत असल्याचे त्या महिलेने माहेरच्या मंडळींना सांगितले. त्यानंतर त्या महिलेचा भाऊ आणि भाऊजी यांच्यात वितुष्ट आले होते.

नक्की वाचा - बापाच्या डोळ्यासमोरच चिमुकली खेळत होती, पण भरधाव वाहन आलं अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

 
यानंतर या महिलेच्या भावाने आपला एका सहकऱ्यासह श्‍यामनगर गाठले. त्यानंतर भाऊजीला तेथे बोलावून घेतले. यावेळी बहिणीला त्रास देण्याच्या कारणातून साळा आणि भाऊजीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यातून संतापलेल्या साळ्याने भाऊजीला बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने भाऊजीचा कान कापला. 

या घटनेची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, घटनेनंतर हल्लेखोर भाऊ पसार होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात संजय आकुलवार, अमजद खान, नितीन रायपुरे, रवींद्र पंधरे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने साळ्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. बहिणीला होणाऱ्या त्रासाचा बदला साळ्याने चक्क भाऊजीचा कान कापून घेतल्याच्या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा आहे.


संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT