educated man maintaining business of father in Gadchiroli  
विदर्भ

बेरोजगारीत निराश न होता उच्च शिक्षित तरुणानं सुरु केलं कौतुकास्पद काम; आर्थिक परिस्थितीमुळे संभाळतोय वडिलांचा व्यवसाय 

मिलिंद उमरे

गडचिरोली : जगात कुठलंच काम लहान किंवा मोठं नसतं असं म्हणतात. काम करताना त्या कामाप्रती असलेली भावना महत्वाची असते. सध्या गडचिरोली जिल्ह्यातील एक तरुण हीच गोष्ट प्रत्यक्षात जगतो आहे. हातात उच्च शिक्षणाच्या पदवीची भेंडोळी असूनही कुठेच नोकरी किंवा मोठी संधी न मिळाल्याने तो आता वडिलांचे अंडीविक्रीचे दुकान सांभाळत आहे. विनोद श्‍यामसुंदर उराडे, असे या हिंमतबाज तरुणाचे नाव आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विनोद उराडेला शिक्षणात विलक्षण गती आहे. पण कमवा आणि शिका, याच तत्त्वाचे त्याला पालन करावे लागले. अगदी सातव्या वर्गापासून ते दहावीपर्यंत त्याने वृत्तपत्र विक्रीचे काम केले. दहावीपासूनच पुढे त्याला आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचा अंडीविक्रीचा व्यवसाय सांभाळावा लागला. स्थानिक इंदिरा गांधी चौकात त्याचे छोटेसे अंडीविक्रीचे दुकान आहे. हा व्यवसाय सांभाळतानाही त्याने शिक्षणावरचे लक्ष विचलित होऊ दिले नाही. उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत त्याने येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. 

एकीकडे छोट्याशा अंडेविक्रीच्या दुकानात ग्राहक सांभाळतानाच त्याने अभ्यासाचा समतोलही साधला आणि मागील वर्षीच आपले अभियांत्रिकीचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. स्थापत्य अभियंता झाल्यानंतर आपले नशीब पालटेल. चांगल्या शासकीय विभागात नोकरी मिळेल किंवा मोठ्या कंपनीत काम मिळेल, अशी स्वप्ने तो रंगवत होता.

सध्याच्या कोरोनाच्या महामारीत आधीच नोकऱ्यांवर गंडांतर येत असून प्रत्येक क्षेत्र थंडावले आहे. त्यामुळे त्याच्यावरचा बेरोजगारीचा शिक्‍का पुसलाच गेला नाही. अखेर त्याने आहे तोच व्यवसाय नीट करण्याचा निर्णय घेतला. उच्च शिक्षणाच्या पदवीची भेंडोळी कपाटात जपून ठेवत पुन्हा अंडी विक्रीच्याच व्यवसायात व्यस्त झाला. 

येथेही व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने आता तो विविध समारंभाचे कॅटरिंगचे कंत्राटही घेतो. खरेतर मोठ, मोठ्या इमारती, पूल, रस्ते बांधण्याचे कंत्राट घेण्याची क्षमता त्याच्या शिक्षणात आहे. पण, परिस्थितीचा रेटा आणि एकूणच देशात उद्‌भवलेली समस्या, ती निवारू न शकलेले सरकार, यामुळे त्याच्या वाटाच बंद झाल्या. असे असले, तरी हाती असलेले कोणतेही काम छोटे नसते, या भावनेने तो आपला छोटासा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहे. एखादी शैक्षणिक पदवी मिळताच शेतातील मातीत हात न घालणाऱ्या, छोटी नोकरी किंवा व्यवसायांना नकार देणाऱ्या तरुणांना विनोदचा हा संघर्ष बरेच काही शिकवणारा आहे.

नृत्यकलेतही निपुण

शासकीय तंत्र निकेतनमधून स्थापत्य अभियंता झालेला विनोद उराडे नृत्यकलेतही निपुण आहे. गडचिरोलीच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील नृत्य स्पर्धेत त्याने सलग दोनदा प्रथम क्रमांक पटकावला. शिवाय मुंबईत पार पडलेल्या सीएम चषक स्पर्धेतील समूह नृत्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT