educated youth earn 40 lakh profit through orange farming in amravati 
विदर्भ

Success story : उच्चशिक्षित तरुणाची शेतीकडे धाव, फळबागेतून वर्षाला कमावितो ४० लाखांचा नफा

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : सामान्यपणे शिक्षण घेतलेल्या तरुणांचा कल नोकऱ्यांकडे असतो. नोकरीसाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास तयार असतात. मात्र, एका उच्च विद्याविभूषित युवा शेतकऱ्याने आपल्याकडील पदव्या बाजूला ठेवत शेतीमध्येच आपले करिअरबनविले. आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर संत्र्याची फळबाग फुलविली. आज तो खर्च वगळता ४० लाख रुपयांचा नफा कमावितो. 

मयूर प्रवीण देशमुख, असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. चांदूरबाजार तालुक्‍यातील काजळी येथे राहणारे प्रवीण देशमुख यांनी एमए, डीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 32 एकर शेती असून त्यामध्ये संत्र्याची सहा हजार झाडे लावली आहेत. उपलब्ध संसाधनाच्या आधारे मयूर देशमुख यांनी संत्रापिकाची माहिती घेत संत्राबाग फुलविली. त्यांना यामध्ये त्यांचे काका छोटू देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.

विशेष म्हणजे यंदा संत्रा बगीचा चांगलाच बहरला असून मयूर यांना जवळपास 300 टन संत्र्याचे उत्पन्न झाले आहे. खर्च वगळता त्यांना तब्बल 40 लाखांचा नफा मिळाला. आपल्या संत्राबागेत रासायनिक फवारणी कमीत कमी करण्यावर त्यांचा कल असतो. शेणखताचा अधिक वापर ते करतात. मेहनत, जिद्द आणि चिकाटीसोबतच शेतीचे योग्य ते नियोजन केले, तर शेतामधून लाखो रुपयांचे उत्पन्न कसे घेता येते याचे जिवंत उदाहरण मयूर देशमुख आहे. त्यांनी केलेले विविध प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत. 

तणनाशकाची कमीत कमी फवारणी -
संत्रा बागायतदारांनी आपल्या शेतात तणनाशकाची फवारणी कमीत कमी करावी. पावसाचे पाणी आल्यास ते शेताबाहेर काढण्यासाठी नालीचा उपयोग करावा. शेतीमध्ये शेततळे असणेसुद्धा गरजेचे आहे.
- मयूर देशमुख, प्रयोगशील शेतकरी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT