Eknath Shinde Gadchiroli 
विदर्भ

Eknath Shinde Gadchiroli: एकनाथ शिंदेंचा पहिल्याच कार्यक्रमात अजितदादांना सल्ला! म्हणाले, "तोंडात अंजिर अन्..."

Sandip Kapde

Eknath Shinde Gadchiroli: गडचिरोली येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा एकत्र होते.  यावेळी एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले.

गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी जमा झालेली आहे. ११ लाख लोकसंख्येपैकी पावणे सात लाख लोकांची लाभार्थी म्हणून नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड मोडलेले आहे.  

अजित पवार पहिल्यांदा कार्यक्रमात आलेले आहेत. अनेक घटना पहिल्यांदा घडलेल्या आहेत. सरकारच्या वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोलीमध्ये होत आहे. सर्वसामन्य लोकांना योजनांचा लाभ व्हावा, यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतला आहे, असे शिंदे म्हणाले.

सरकारी काम सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही मोडीत काढली आहे, असे शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे. तोंडात अंजिर आणि हातात खंजीर असलेले लोक घातक असतात. पक्षात दुय्यम स्थान दिल्यानंतर अशा घटना घडतात, असा सल्ला शिंदेंनी पवारांना दिला, असे शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले,  मेहनती आणि कष्टकरी माणसाला जेव्हा दुय्यम स्थान दिले जाते. त्याच्यावर अन्याय होतो. त्यावेळी अजित पवार यांच्यासारख्या घटना घडतात. त्यामुळे हे ट्रीपल इंजीन सरकार राज्याला विकासाकडे घेऊन जावू,  तोंडात अंजिर आणि हातात खंजीर असलेले लोक घातक असतात, असे अजित पवार यांना कळले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT