ESIC hospital closed in Amravati due to corona
ESIC hospital closed in Amravati due to corona  
विदर्भ

कोरोनामुळे कामगार विमा दखाखान्याला कुलूप; पर्यायी व्यवस्थेचा अभाव

संतोष ताकपिरे

अमरावती : शहरातील कामगार विमा दवाखान्यातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णालयाला दोन दिवसांपासून कुलूप लागले आहे. त्यामुळे येथे औषधोपचार व तपासणीसाठी येणाऱ्या कामगारांना परत जावे लागत आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुविधेसाठी राज्य शासनाने हा दवाखाना सुरू केला. कामगार व कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना येथून उपचार घेता येतात. शिवाय याच रुग्णालयाचे संमतिपत्र असल्याशिवाय संलग्नित रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. तात्पुरत्या किरकोळ आजारावील औषधे कामगार विमा रुग्णालयातून दिल्या जातात. परंतु दोन दिवसांपासून कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने विमा दवाखान्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले आहे. 

शिवाय पुढील आदेशापर्यंत रुग्णालय बंद राहील, अशा आशयाची सूचना येथे चिकटविण्यात आली. कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्याची पूर्वकल्पना नसल्यामुळे दोन दिवसांपासून येथे येणाऱ्या रुग्णांना आल्या पावली परत जावे लागते. शासनाच्या व्यवस्थेतून कामगार विमा दवाखाना सुरू असल्यामुळे कामगारांचे हाल होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे गरजेचे होते. परंतु तसे न करता चक्क रुग्णालयालाच कुलूप लावले. 

गर्भवती महिलांना दर महिन्याला कामगार विमा रुग्णालयातील डॉक्‍टरांचा सल्ला आणि पुढील औषधोपचारासाठी संलग्नित रुग्णालयात पाठविल्या जाते. परंतु अशा महिलांनाही दोन दिवसांपासून हाल सोसावे लागत आहेत. काही कामगार रुग्ण व त्यांच्या कुटुंबातील सदस्य संलग्नित रुग्णालयात जाऊन आले असता तेथेही अनुमतीशिवाय उपचार होत नसल्याचे सांगण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT