विदर्भ

खोदकामाचा मलबा दुभाजकात

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : रिंग रोडच्या सिमेंटीकरणाची कामे सुरू असून जुने डांबरी रस्ते खोदण्यात आले. या जुन्या रस्त्यांचा डांबरसह गिट्टी आदीचा मलबा मध्यभागी दुभाजकासाठी सोडण्यात आलेल्या जागेवरच टाकण्यात येत आहे. दुभाजकाच्या जागेत शोभीवंत झाडे लावण्याचे प्रस्तावित असून डांबरयुक्त गिट्टीमध्ये झाडे कशी लागणार? असा प्रश्‍न "जनमंच'ने आज उपस्थित केला. याशिवाय पन्नास वर्षे सिमेंट रस्ते टिकतील, असा दावा केला जात असला तरी दोन वर्षांतच अनेक रस्त्यांना तडे गेल्याचेही उघडकीस आले.
"जनमंच' या संस्थेने आज सकाळी धरमपेठेतील ट्राफिक पार्क ते अलंकार टॉकिज चौकापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्याला संपूर्ण तडे गेले आहे. फूटपाथवरही मोठे खड्डे तयार झाले आहेत. याठिकाणी आयब्लॉक लावताना कंत्राटदाराने हात आखडता घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होत असल्याचे जनमंचचे सचिव नरेश क्षीरसागर यांनी सांगितले. या रस्त्यावरील फूटपाथ ड्रेनेज लाइनवर आहे. या ड्रेनेज लाइनवरील चेंबरची झाकणेही लहान-मोठी असल्याने एखादा पादचारी त्यात पडण्याची शक्‍यता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेले आयब्लॉकही निघाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT