भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले कोथुर्णा येथील गावकरी. 
विदर्भ

वाळू ट्रॅक्‍टर अपघातातील मृताचे कुटुंबीय धडकले जिल्हा कचेरीवर...मग आमदारांनी केली मदत

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्‍टरने धडक दिल्यामुळे कोथुर्णा येथील शरद उके (वय 35) यांचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी गदारोळ केला होता. मात्र आज, बुधवारी (ता. 3) मृताचे कुटुंबीय व गावकरी न्याय मागण्यांसाठी जिल्हा कचेरीवर धडकले.

कोथुर्णा या वैनगंगा नदीच्या काठावरील गावाला वर्षभर वाळूउपसा व वाहतुकीचा त्रास होत आहे. सतत अवजड वाहने या गावावरून भरधाव वेगात धावतात. त्यामुळे लहानमोठे अपघात होतात. सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्याचा फटका गावकरी व विद्यार्थ्यांना बसत आहे.

मंगळवारी कोथुर्णा येथील शरद उके हा पत्नीसोबत दुचाकीने कामानिमित्त वरठी येथे आला. सायंकाळी गावी परत जात असताना गावापासून एक किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्‍टरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांचा सौम्य लाठीमार

अवैध वाळूच्या ट्रॅक्‍टरने अपघात होऊन शरदचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांना झाल्यावर सर्व गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक अडवून ठेवली. मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या, वाळूच्या अवैध वाहतुकीवर प्रतिबंध करा, अशा मागण्या करीत गावकऱ्यांचे आंदोलन वाढत होते. दरम्यान, ते अपघातग्रस्त ट्रॅक्‍टरला आग लावण्याचा धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना पांगविले. तोपर्यंत मृतदेह उचलण्यास गावकऱ्यांचा विरोध सुरू होता.

पोलिसांच्या मध्यस्थीने गावकरी शांत

पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करून वाटाघाटी सुरू केली. खबरदारी म्हणून गावात पोलिस तैनात करण्यात आले. दरम्यान, तहसीलदार, पोलिस अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांची समजूत काढून गावकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

25 लाखांची मदत द्या

आज, बुधवारी सकाळी 11 वाजता कोथुर्णा येथील मृताचे कुटुंबीय व गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते. यावेळी मृताच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी मृताच्या दोन्ही चिमुकल्यांनासुद्धा गावकऱ्यांनी आणले होते. अधिकाऱ्यांनी याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्‍वासन दिले.

अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला मदत

मृत शरद उके याच्या कुटुंबाला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी घनश्‍याम भूगावकर यांच्या कक्षात त्यांनी धनादेश दिला. यावेळी उपस्थित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा 20 हजार रुपयांचा मदतनिधी मृताच्या कुटुंबाला देण्याचे मान्य केले. तसेच ट्रॅक्‍टर मालकाकडून या कुटुंबाला दोन लाख रुपयांची भरपाई देण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले. याशिवाय मृताच्या आईवडिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, जखमी पत्नीला महसूल विभागात कंत्राटी नोकरीत सामावून घेण्याचे व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आमदार भोंडेकर यांनी दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT