farmer fired his soyabean crops as state government is not helping him
farmer fired his soyabean crops as state government is not helping him  
विदर्भ

बळीराजाने जाळले शेतातील सोयाबीनचे पीक; सरकारकडून मदत मिळत नसल्याने उचलले पाऊल 

राजकुमार भितकर

यवतमाळ: यंदा संपूर्ण राज्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं. अतिवृष्टी, धरणांतून सोडण्यात आलेलं पाणी आणि परतीच्या पावसानं बळीराजाच्या पिकांचं नुकसान केलं. घाम गाळून, कष्ट करून वाढवलेल्या सोयाबीनच्या पीकाचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपेक्षा होती ती फक्त सरकारच्या मदतीची. मात्र तालुका सरकारी निकषात बसत नाही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं . मग त्या संतापलेल्या बळीराजानं टोकाचं पाऊल उचललं. 

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी असमानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त आहे . सुरवातीला शेतकऱ्यांना दुबार पेरणीला  सामोरे जावे लागले . कशीबशी पैश्याची तयारी करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली . जिल्ह्यात दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पिके दिमाखात उभी होती .शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे पडतील अशी आशाही निर्माण झाले होती . पण परतीच्या पावसाने पिकांचे मातेरे केले . 

शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही नष्ट झाल्यात. अश्याच शेतकऱ्यांपैकी एक आहेत महागावचे मनीष जाधव. पावसाने उसंत घेतल्याने सोयाबीन सोंगणीस सुरवात केली .सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले .

संतप्त झालेल्या मनीष यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले. आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे . जिल्ह्यात शेतकऱयांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे . सरकारी निकष बदलून शेतकऱयांना सरसकट मदत देणे गरजेचे आहे . अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी पुरता कोलमडून जाईल .       

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT