अकोला : गेल्यावर्षीचा शेतमाल अजूनही घरात पडून, कोरोनाचे संकट दारात, पोटाला रोजच बसतोय चिमटा तरी, शेतकरी खरिपात कष्ट उपसायला तयार आहे. परंतु, पीककर्जच मिळत नसल्याने त्याला बँकेसमोर हतबल व्हावे लागत असून, पैशाशिवाय खरीप पेरायचा कसा, या दुविधेत तो सापडला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळ अतिवृष्टी किडीचा प्रादुर्भाव तसेच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला परंतु, अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरीप तसेच रब्बीमधून सुद्धा शेतकर्यांच्या हाती काहीच उरले नाही. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रांनी सुद्धा गेल्यावर्षीचा शेतमाल खरेदी करण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे झालेले उत्पादनसुद्धा शेतकर्यांच्या घरात पडून आहे.
आवश्यक वाचा - हृदयद्रावक : घरी जाण्याचा परवाना मिळाल्याने झाला होता आनंद, मात्र घरी पोहोचण्याआधीच क्षणार्धात बदलला दुःखात
आता तर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व तो रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून खराब होत आहे. एकंदरीत या सर्व दुष्टचक्रात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय खालावलेली आहे. आता खरीप तोंडावर येऊन ठेपला आहे. परंतु खरिपाची तयारी करायची तर, खिशात पैसा हवा आणि त्यासाठी शेतकरी बँकांकडे पीक कर्जासाठी चकरा मारत आहे. परंतु बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने, खरीप पेरायचा कसा? या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पीककर्ज माफीनंतरही नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची कर्जखाते सुद्धा नील झाली आहेत. मात्र असे असतानाही या शेतकऱ्यांना काही बँकेकडून नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत.
खिशात नाही दमडी, कर्जफेड करणार कशी!
सप्टेंबर 2019 पर्यंत उचल केलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज, राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ केले आहे. परंतु खरीप 2019 करीता घेतलेले पीककर्ज माफ करण्यात आले नाही आणि याच हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली. परंतु, या स्थितीतही शेतकऱ्यांनी कर्जफेड करावी, असा रेटा बँकांनी लावून धरला असून, जुने कर्ज भरल्याशिवाय नवीन कर्ज सुद्धा दिले जात नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना यंदा पीककर्जापासून वंचित रहावे लागू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.