Farmer leader blames fraud done In a co-operative society of farmers  
विदर्भ

दर्यापूर शेतकरी सहकारी संस्थेत तब्ब्ल ६९ लाख रुपयांची अफरातफर? कामगार नेत्याचा आरोप

सुरेंद्र चापोरकर

दर्यापूर (जि. अमरावती):  दर्यापुरातील शेतकऱ्यांच्या भागभांडवलावर उभ्या झालेल्या दी दर्यापूर शेतकरी सहकारी जिनिंग संस्थेत ६९ लाख रुपयांच्या अफरातफरीचा ठपका लेखा परीक्षणात ठेवण्यात आला असल्याचा आरोप कामगार नेते रवी कोरडे यांनी केला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री तथा सहकारमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत संस्थेच्या आर्थिक कामकाजासंबंधी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

दर्यापुरातील अग्रगण्य समजली जाणारी शेतकरी सहकारी जिनिंग संस्था बनोसा मार्केट परिसरात होती. सद्यस्थितीत या संस्थेने शिवर रोडला जागा घेत जिनिंग व कार्यालय सुरू केले. जवळपास १०६७ शेतकऱ्यांनी भागभांडवलाची गुंतवणूक करीत संस्था उभी केली. लोकनियुक्त संचालक मंडळ कार्यरत झाले. 

शहराच्या मध्यवस्तीत असलेली जिनिंगची जागा व मालमत्तेची नियोजनबद्ध विक्री करीत सदर जिनिंग शिवर रोड येथे कार्यरत केली. सात एकर जमिनीवर जिनिंग छोट्या स्वरूपात उभी करीत शेतकरी जिनिंग अल्पावधीत बंद झाली. याकरिता १.९२ कोटी रुपये खर्च झाला. 

कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी देणे होता, मात्र जमीनविक्री केल्यावरही कामगारांचे देणे थकीत झाले. संस्थेने मालकी असलेली जागा व गोदाम ठराव पारित करून भाड्याने दिले. लेखा परीक्षणात संस्थेत अफरातफर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. तत्कालीन लेखा परीक्षकांनी सहायक निबंधकांना अहवाल सादर करीत ६९ लाख रुपयांची संशयास्पद उलाढाल झाल्याचे नमूद केले.

निबंधकांनी सुनावणीकरिता बोलाविलेल्या संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांनी रक्कम भरण्यास नकार दिला. शेतकऱ्यांची संस्था असल्यामुळे यावर सहकार मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे कामगार नेते रवी कोरडे यांनी तक्रार दाखल केली असून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.


शेतकरी सहकारी जिनिंगमध्ये जवळपास ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यासंबंधी लेखा परीक्षणात ठपका ठेवण्यात आला आहे. करोडो रुपयांची जमीन विकून कामगारांचे पैसे थकविणारे हे संचालक मंडळ आहे. यावर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांना पाठविले आहे.
- रवी कोरडे
कामगार नेते, दर्यापूर.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Subsidy : 'एलपीजी सबसिडी' बंद होणार?; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

Pune Election: सेम टू सेम आर्ची! पुण्याच्या निवडणुकीत आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण?

Pune Political : सूत्रे हलली, रात्रीत चित्र बदलले; कोथरूडमध्ये भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’, उमेदवारांची फेररचना!

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये चुरशीची तिरंगी लढत

Latur Crime : अहमदपूर तहसील कार्यालयात बनावट सह्या, शिक्के वापरून फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT